शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नेट आॅनलाइन, तर सेट आॅफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:13 IST

वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

नाशिक : वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून सेट परीक्षेसाठी जवळपास दहा हजार, तर सेट परीक्षेसाठी सहा ते सात हजार उमेदवारांनी शनिवारपर्यंत (दि.३०) आॅनलाइन अर्ज दाखले केले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ३५वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २३ जून रोजी होणार असून, या परीक्षेसाठीचे वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर झाले आहे, तर राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा दि. २० ते २८ जून या कालावधीत होणार असून, या दोन्ही परीक्षांसाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत शनिवारी (दि.३०) संपली आहे. सेट परीक्षेतील पहिल्या प्रश्नपत्रिकेत ६० ऐवजी ५० प्रश्न असतील.हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना १०० प्रश्न सोडवावे लागतील. सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून सहा टक्के उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. खुल्या वगार्साठी ४० टक्के, तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ टक्के गुण मिळविण्याचे निकष यासाठी लावण्यात आले आहेत. परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी उमेदवारांना पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून, नेटसाठी एनटीएच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.तीनशे गुणांसाठी परीक्षानॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २० ते २८ जूनदरम्यान नेटची आॅनलाइन परीक्षा होणार असून, एनटीएच्या संकेतस्थळावर ३० मार्चपर्यंत नेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया पार पडली. डिसेंबर २०१८ मध्ये प्रथमच नेट पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. नव्या अभ्यासक्रमावर आधारित दोन पेपरची नेट परीक्षा होणार असून, पहिला पेपरमध्ये ५० प्रश्नांसाठी १०० गुण, तर दुसरा पेपर संबंधित विषयावर आधारित १०० प्रश्नांसाठी २०० गुणांसाठी असे दोन पेपर होणार आहे. या परीक्षेचा निकाल जुलैमध्ये जाहीर होईल. नेट-सेट परीक्षेसाठी यापूर्वी तीन पेपर द्यावे लागत होते. त्यात बदल करण्यात आला असून, आता दोन्हीही परीक्षांत दोनच पेपर होणार आहे.

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिक