शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अवैध वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 24, 2016 22:57 IST

घोटी : दोषी वाहनचालकांवर कारवाईची मागणी

घोटी : इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून ग्रामीण भागात जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याने व स्थानिक वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेचे या प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या बेकायदेशीर अवैध वाहतुकीला जिल्हा वाहतूक शाखेने अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे.इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात लगतच्या अकोले, राजूर, शेंडीसह तालुक्यातील अन्य गावांतून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारहाटसाठी तसेच विविध कामांसाठी घोटीत येत असतात. अनेक वर्षांपासून या भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली असून, वाहनांच्या टपावर प्रवाशांना बसवून जीवघेणी वाहतूक केली जात असल्याने अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. या बाबीकडे घोटी पोलीस ठाण्याने नियुक्त केलेले वाहतूक पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या अवैध वाहतुकीला स्थानिक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखाही महिन्यातून एकदा कारवाईचा दिखावा करीत आहे. घोटी शहरातून बेकायदेशीर व अवैध वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)