शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षांपासून नगरसेवकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:31 IST

सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देराजश्री पार्क: नागरिक आंदोलनाच्या तयारीत

सातपूर : गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर मंदिराजवळील राजश्री पार्क परिसरातील समस्या कायम असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी 'नगरसेवक नेमके काय काम करतात' असा प्रश्न उपस्थित केला आहे.सावरकरनगर येथील राजश्री पार्क ही वसाहत 15 वर्षांपासून तयार झाली आहे.अंतर्गत रस्त्यांची साधी डागडुजी देखील केली नसल्याने दुरावस्था झाली आहे. निळकंठेश्वर मंदिर ते राजश्री पार्क रस्ता पंधरा वर्षात एकदाही डांबरीकरण झालेला नाही.या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.हा रस्ता त्वरित डांबरीकरण होणे गरजेचे आहे.तसेच उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे आरोग्याच प्रश्न निर्माण झाला आहे.या ठिकाणी उद्यान विकसित करण्यात यावे,पथदीप नादुरुस्त अवस्थेत आहेत.पाच ते दहा वर्षांपूर्वी उदयास आलेल्या वसाहतींना सर्व सुविधा पुरविल्या जातात.तेथील समस्यांकडे लक्ष दिले जाते.मात्र आम्ही गेल्या 15 वर्षांपासून येथे राहतो आमच्याकडे कोणीही फिरकून पहात नाहीत.नगरसेवक नेमकी कोणती कामे करतात.असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,रवींद्र पाटील,वाकलकर, वीर,जालिंदर विधाते,उत्तम विधाते,बापू सोनवणे,काश्मीरे, पगारे,सिंग आदींसह संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.महानगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी दखल घेऊन राजश्री पार्क मधील समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादीच्या स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे (फोटो ल्ल२‘ वर राजश्री)

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका