शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अनास्थेमुळे कलाकारांची होतेय उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:54 IST

शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्था आणि पालकांनी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागातर्फे २३ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित ५९व्या कलाप्रदर्शनाला भेट देत विविध कलाकृतींना दाद दिली.

नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्था आणि पालकांनी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागातर्फे २३ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित ५९व्या कलाप्रदर्शनाला भेट देत विविध कलाकृतींना दाद दिली. परंतु, येथील महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कलाकारांची उपेक्षा होत असल्याची खंत प्रदर्शनाच्या आयोजकांनी व्यक्त केली आहे.कलाक्षेत्रासमोर सर्वांत मोठे आव्हान आर्थिक स्वरूपाचे असते. त्यामुळे कलाकारांना त्यांच्या कलाकृती सादर करण्यासाठी माफक दरात कलादालन उपलब्ध होणे अपेक्षित असते. परंतु नाशिक महानगरपालिकेकडून महाक वी कालिदास कलामंदिरप्रमाणेच महात्मा फु ले कलादालनासाठी अवाढव्य भाडे आकारले जात असल्याने कलाकारांना येथे कलाप्रदर्शन भरविणे परवडणारे नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने महाकवी कालिदास कलामंदिरसोबतच महात्मा फुले कलादालनाचेही अद्यावतीकरण केले. परंतु, या कामात कला क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला गेला नसल्याने दालनात प्रकाश योजना, रंगसंगती आणि सादरीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अनेक तांत्रिक उणिवा राहिल्या असल्याचे सहायक प्रदर्शन अधिकारी राहुल थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नाशिक शहरात राज्यस्तरीय प्रदर्शन सुरू असताना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. परंतु, येथील लोकप्रतिनिधींनी अथवा महानगरपालिकेच्या कला व सांस्कृतिक तसेच शिक्षण विभागाच्या कोणत्याही अधिकाºयांना या प्रदर्शनाची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही हे खेदजनक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.सुविधांचा अभावकलादालनात प्रकाशयोजना, रंगसंगतीचा अभाव असून, सादरीकरणासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये अनेक तांत्रिक उणिवा आहेत. येथे येणाºया कलाकारांच्या निवासाची व्यवस्था नाही. शिवाय कलादालनाचे स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने कलारसिकांची गैरसोय होते. दालनात योग्य प्रकाश योजना आणि उपहारगृहाची सोय नसल्याने येथे येणारा कलारसिक अधिकवेळ थांबत नाही. शहरातील अनेकजण सायंक ाळी उशिरा बाहेर पडतात. परंतु योग्य प्रकाश योजनेअभावी प्रदर्शन सायंकाळी ७ वाजताच बंद करावे लागत असल्याने अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयोजकांनी शेवटचे दोन दिवस आहे त्याच परिस्थिती प्रदर्शन सायंकाळी ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. संचालनालयाने आवश्यक साहित्याची जुळवाजुळव केली, परंतु सामान्य कलाकारांसाठी असे करणे अतिशय कठीण असल्याचेही प्रदर्शन अधिकाºयांनी सांगितले.सहा दिवसांच्या ५९व्या कलाप्रदर्शनात सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जवळपास दहा हजार कलारसिकांनी महात्मा फुले कलादालनातील प्रदर्शनाला भेट दिली. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रविवारपासून प्रदर्शनाची वेळ वाढवून सायंकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रदर्शनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महात्मा फुले कलादालन येथे विविध प्रदर्शने होतात, परंतु येथे कला सादरीकरणाच्या सुविधांचाच अभाव आहे. कलादालन केवळ स्मार्ट म्हणून होत नाही, तर तेथील सुविधांनी ते स्मार्ट होते. येथे कलारसिकांच्या सुविधांचाही विचार केलेला नाही. त्याचप्रमाणे कलाकाराच्याही सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झालेले दिसते, असे असतानाही महापालिकेकडून अवाढव्य भाडे आकरले जाते. कला संचालनालयाला या सहा दिवसांच्या प्रदर्शनासाठी तब्बल १ लाख २० हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे येथे प्रदर्शन भरविणे सामान्य कलाकारांना परवडणारे नाही.  - राहुल थोरात, सहायक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाartकला