शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

भाजपेतर सरकारमुळे धागेदोरे :  क न्हैया कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 02:01 IST

महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा

नाशिक : महाराष्ट्रात पोलीस व सीबीआयसारख्या तपास संस्था सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करतानाच कर्नाटक पोलिसांनी केलेल्या प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपासातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे पोहोचल्याचा दावा आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे नेते (एआयएसफ) कन्हैया कुमार यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील तपास यंत्रणाही सरकारच्या दबावात काम करीत असल्याचा आरोप करतानाच क न्हैया कुमार शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. २०) भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली.  देशात लोकशाही व तर्कशुद्ध विचार मांडणाºयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. जाहीररीत्या कोणी भूमिका मांडत असल्यास त्यांच्यावर हल्ले होतात किंवा हत्या केली जाते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेशसारख्या व्यक्तींसोबतही हाचप्रकार घडला. परंतु तपास यंत्रणांवर भाजपा सरकारचा दबाव असल्याने महाराष्ट्र पोलिसांसह सीबीआयला या प्रकरणाचा तपास पाच वर्षांत लावता आला नाही. मात्र कर्नाटकमध्ये गैरभाजपा सरकार असल्याने गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासातून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकºयांपर्यंचे धागेदोरे मिळाल्याने दाभोलकºयांच्या मारेकºयांना अटक झाल्याचा दावा कन्हैया यांनी केला आहे. सरकार तपास यंत्रणा, माध्यमे तसेच न्याययंत्रणांना कमकुवत करीत असल्याचे सांगत न्यायमूर्ती लोया प्रकरणातही याचाच प्रत्यय आला. दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा बंदोबस्त असतानाही गोळ्या चालविणाºयांनाही सरकारचे संरक्षण असून, उमर खालिदवरील हल्ल्याचा उल्लेख करून एवढ्या बंदोबस्तात गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न उपस्थित करताना हा सत्तेविरोधात बोलणाºयांचा आवाज दाबण्याचा आणि देशवासीयांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कन्हैयाने केला आहे. देशात जमावाच्या मारहानीचे प्रकार वाढत आहे. अशी मारहाण करणाºयांनाही सरकारचेच संरक्षण असून, देशात भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी असे प्रकार घडवले जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.राफेलची किंमत का सांगत नाही?पंतप्रधान संसदेत एलइडीची किंमत सांगतात. परंतु राफेल विमानाची किंमत का सांगत नाही, तसेच कचºयातून निर्मित होणाºया गॅसवर बोलणारे मोदी नाल्यात उतरून अशाच गॅसमध्ये काम करणाºया कामगारांच्या समस्यांविषयी का बोलत नाही, असा खोचक सवाल कन्हैयाने उपस्थित केला आहे. देशात सध्या एक व्यक्तीकेंद्री सरकार आहे. सर्व कारभार पंतप्रधान पाहत असताना मंत्री केवळ एक दुसºयांचा बचाव करताना दिसत आहेत. विरोधी पक्षात एकजूट नसल्यानेच भाजपा अशाप्रकारे खोटे चित्र निर्माण करीत असल्याचा आरोपही क न्हैयाने केला. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना देशात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना वडापाव विकायला सांगितले जात असून, या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी हिंदू-मुस्लीम द्वेश पसरवला जात आहे. केरळमधील नैसर्गिक आपत्तीतही केंद्र सरकारने दुजाभाव केला. जाहीरातीवर हजारो कोटी खर्च केला जाच असताना केरळच्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी केवेळ ५०० कोटी रुपये दिल्याचा अरोप कन्हैयाने केला. तसेच राज्यघटनेचे उल्लंघन करणाºया संस्थांवर बंदी घालायलाच हवी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.निवडणुका व्यक्तिकेंद्रित करण्याचा घाटलोकशाहीत होणारी निवडणूक ही पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे, तर संसदेचे सदस्य निवडण्यासाठी होते. परंतु, भाजपाने निवडणुका व्यक्तीकेंद्रित करण्याचा घाट घातला असून, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलनात्मक लढत रंगवली जात आहे. प्रत्यक्षात निवडणूक लोकसंख्येचे ४५४ सदस्य निवडण्यासाठी होणार आहे, यापासून संपूर्ण देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी हा घाट घातला जात असल्याची प्रतिक्रिया कन्हैया यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमार