शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

ओेझरखेडचे आवर्तन सोडण्याची निफाड, चांदवडकरांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:26 IST

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.

ठळक मुद्देशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल.

लासलगाव : ओझरखेड कालव्याचे पाणी जायकवाडीला सोडू नये, ओझरखेड कालव्याचे आवर्तन तातडीने सोडावे आणि निफाड व येवला तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पंचायत समिती सदस्य शिवा सुरासे, खडकमाळेगावचे सरपंच दत्त रायते, कोटमगावचे सरपंच तुकाराम गांगुर्डे, शिरवाडेचे सरपंच शरद काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे दिले.ओझरखेड कालव्याअंतर्गत येणाºया गावांमध्ये गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस न झाल्याने परिसरात शेतकरीवर्गापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात आजही भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ओझरखेड कालव्याच्या लाभ क्षेत्रामध्ये ७०हून अधिक पाणीवाटप सहकारी संस्था आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकºयांनी या कालव्याच्या भरोशावर द्राक्षबागेसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले असून, आपल्या द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत.ओझरखेड कालव्यातून चांदवड तालुक्यासाठी ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता ओझरखेड धरणातून जायकवाडीत पाणीपुरवठा केल्यास या भागात भीषण पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठीचे निवेदन पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले. यावेळी शरद काळे, माधवराव ढोमसे, रावसाहेब रायते, मोतीराम रायते, विठ्ठल कहाने, सारोळे, सरपंच कैलास भोसले, वनसगाव सरपंच उमेश डुंबरे, योगेश रायते, रामनाथ शिंदे, नंदू काळे, शंकर शिंदे, दत्ता मापारी, नंदू खुर्द, दादासाहेब खराटे तसेच विविध गावांतील पाणीवापर संस्थांचे चेअरमन उपस्थित होते.सटाणा, देवळा शहरासाठी पहिले आवर्तन १० नोव्हेंबरलासटाणा : शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या१० नोव्हेंबरपर्यंत चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा नदीपात्रात पहिले आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. यंदा पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. बागलाण तालुक्यातील केळझर मध्यम प्रकल्प व कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात सोडले जाणारे पाण्याचे आवर्तन जिल्हा प्रशासनाने थांबविले आहे. सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा व आरम नदीपात्रातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.सध्या शहरात दहा दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना भटकंती करावी लागत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरु वातीलाच दिवाळीचा सण येत असून नागरिकांना या सणासाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे १० नोव्हेंबर ऐवजी १ नोव्हेंबरला पाण्याचे आवर्तन सोडावे, या आग्रही मागणीसाठी आमदार डॉ. राहुल अहेर, सटाणा पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता उन्हाळ्यात सटाणा शहरासाठी शंभर दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी चणकापूर धरणातून आवर्तनाने सोडणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी या भेटीत सांगितले. यावेळी महाराणा प्रताप क्र ांतिदलाचे जिल्हाध्यक्ष नाना मोरकर, हेमंत भदाणे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.निफाड आणि येवला तालुक्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे ओझरखेड कालव्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यास आमचा विरोध आहे. शासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल.- शिवा सुरासे, पंचायत समिती सदस्य.