शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेहेर सिग्नलजवळ कडुलिंबाचे झाड पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:07 IST

मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़

नाशिक : मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ दरम्यान, हा वृक्ष विद्युत पोलवर पडल्याने दोन विद्युत पोल वाकले तर त्यांच्या ताराही तुटल्याने या ठिकाणची वाहतूक अशोकस्तंभाकडून गंगापूररोडकडे वळविण्यात आली होती़अशोकस्तंभ ते मेहेर रस्त्यावरील मित्रविहारजवळील महाकाय निंबाचा वृक्ष सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ यामुळे रस्तादुभाजकावर असलेले विजेचे दोन खांब खाली कोसळले तर विद्युतताराही तुटल्या़ महाकाय वृक्ष पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती़ या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली़  या घटनेची माहिती अग्रिशामक विभागास दिल्यानंतर अवघ्या काही वेळेतच ते घटनास्थळी दाखल झाले व कटरच्या साहाय्याने रस्त्यावरील वृक्षाच्या फांद्या हटविण्याचे काम सुरू केले़  वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी अशोकस्तंभापासून वाहने गंगापूर रोडकडे वळविण्यात आली होती़ सीबीएस सिग्नलवरील वाहने शालिमारकडे तर मेहेर सिग्नलपासून महात्मा गांधी रोडकडे वळविण्यात आली.तसेच निमाणीकडे जाणाºया बसेस रेडक्रॉस सिग्नलपासून रविवार कारंजाकडे सोडण्यात आल्याने वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली़सिडको भागात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्पदुर्गानगर येथील अ‍ॅडलॅब थिएटरसमोरील वृक्ष सोमवारी (दि़१६) सायंकाळी उन्मळून फोर्च्यूनर वाहनावर पडला़ यामुळे काहीकाळ याठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांनी झाडाच्या फांद्या हटविल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली़ सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सावतानगर ते त्रिमूर्ती रस्त्यावरील दुर्गानगरच्या अ‍ॅडलॅब्स थिएटरसमोर असलेले झाड रस्त्यावर उभी असलेल्या फोर्च्यूनर या चारचाकी वाहनावर अचानक उन्मळून पडला.यावेळी रस्त्यावरून जाणारे नागरिक व महिला थोडक्यात बचावले़ यावेळी उपस्थित असलेले पवन मटाले, देवेंद्र शेलार, अभिजित सूर्यवंशी, सागर वाघ हे नागरिकांच्या मदतीला धावले़

टॅग्स :Rainपाऊस