शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञान नव्हे तत्त्वज्ञानाची जगाला गरज : अनिल बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:36 IST

तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.

नाशिक : तंत्रविकासाची विध्वंसक बाजू पाहिली तर त्यातून जग हे केवळ विनाशाच्या कडेलोटावर उभे असल्याचे जाणवते. त्यामुळे जगाला विध्वंसक तंत्रज्ञान नव्हे तर विधायक तत्त्वज्ञान वाचवू शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थविचारवंत अनिल बोकील यांनी केले.दीपक करंजीकर लिखित ‘घातसूत्र’ पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोकील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गोदावरी हॉल येथे आयोजित या समारंभप्रसंगी ग्रंथाली प्रकाशनचे संस्थापक दिनकर गांगल उपस्थित होते. यावेळी बोकील म्हणाले. जग युद्धाच्या उंबरठ्यावर असताना करंजीकर यांनी पुस्तकातून नोंदविलेले निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. युद्धामागील तत्त्वज्ञान आणि सूत्रांची मिमांसा त्यांनी पुस्तकातून मांडली आहेत.यावेळी लेखक करंजीकर यांनी पुस्तक लिखानामागील आपली भूमिका मांडली. कळसूत्रीच्या बाहुल्यांची दोरी इतरांच्या हाती आहे त्याचा वेध ‘घातसूत्र’ पुस्तकातून घेण्यात आला आहे. हे पुस्तक लिहिताना ४८१ पुस्तकांचे वाचन आणि सात वर्षे सतत अभ्यास केल्यानंतर आंतरराष्टÑीय घडामोडीचे बारकावे सप्रमाण मांडले आहे.कम्युनिझम, सोशालिझम आणि कॅपिटललायझेशन या त्रिसूत्रीवरच युद्धाचे बिझनेस प्लॅन असतात. त्याची किंमत असेक जीव गमावून चुकवावी लागते हेच वास्तव असल्याचे करंजीकर म्हणाले.पुस्तकाचे अभिवाचन संगीतकार कौशल इनामदार, अभिनेत्री विद्या करंजीकर, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, एटीएसचे डीआयजी दत्तात्रय कराळे यांनी केले.सायबर कम्युनिटीमुळे युद्धाचा धोका वाढलावाढत्या तंत्रज्ञान, सायबर इन्फरमेटिव्ह कम्युनिटीमुळे युद्धाचा धोकाच अधिक वाढला आहे. त्यावेळची कटकारस्थाने आता तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा भाग झाल्यामुळे जगापुढे असुरक्षिततेचा मोठा धोका उभा राहिला आहे. तंत्रज्ञान आणि तत्त्वज्ञान यात फरक करता आला पाहिजे. अनुभवातून शिकलेली जुनी पिढी संपन्न असताना आजच्या तरुणांना सर्व तयार माहिती मिळते आणि त्यात अनुभवाचे शहाणपण नसते. अनुभव आणि प्रतिभा एकत्र आले तरच शहाणपण निर्माण होईल आणि तेच जगाला वाचवू शकेल, असे बोकील म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक