शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांना खरोखरच अधिकार देण्याची गरज; ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन

By संजय पाठक | Updated: January 22, 2021 17:52 IST

नाशिक- महापालिका- नगरपालिकेच्या नगरसेवकांना अधिकार द्यावेत ही नाशिकमध्ये झालेल्या नगरसेवक परीषदेत झालेली मागणी गैर नाही. केंद्र सरकारने ७४ व्या घटना दुरूस्तीत अनेक अधिकार दिले आहेत. परंतु राज्य सरकार ते खाली पाझरत नाही. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार देऊन आणि दायीत्व देऊन बघितले पाहिजे, असे मत नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे सध्याचे अधिकार अपुरेदायीत्व देण्याची गरज

नाशिक- महापालिका- नगरपालिकेच्या नगरसेवकांना अधिकार द्यावेत ही नाशिकमध्ये झालेल्या नगरसेवक परीषदेत झालेली मागणी गैर नाही. केंद्र सरकारने ७४ व्या घटना दुरूस्तीत अनेक अधिकार दिले आहेत. परंतु राज्य सरकार ते खाली पाझरत नाही. त्यामुळे नगरसेवकांना अधिकार देऊन आणि दायीत्व देऊन बघितले पाहिजे, असे मत नगररचना तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी व्यक्त केले.  

नगरसेवकांच्या अडीअडचणी आणि अधिकारांबाबत स्थापन झालेल्या नगरसेवक परीषदेची विभागीय बैठक नुकतीच नाशिकमध्ये झाली. यावेळी अधिकाऱ्यांकडे प्रचंड अधिकार असल्याने नगरसेवकांना देखील त्याच धर्तीवर अधिकार देण्याची मागणी झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न- नगरसेवकांना अधिकाऱ्यांप्रमाणेच अधिकार हवे आहेत, त्याविषयी काय सांगाल?महाजन- खरे आहे. नगरसेवकांच्या मागणीत गैर नाही. अनेक ठिकाणी अडचणी असतात. केंद्र सरकारने महापालिकांना ७४ व्या घटना दुरूस्तीत अनेक अधिकार देऊ केले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी मात्र केली जात नाही. महापालिकांवर आजही शासनाचे नियंत्रण असते. त्यामुळे त्यांना अधिकार मिळाले. पाहिजे.

प्रश्न- घटना दुरूस्तीत कशाप्रकारे अधिकार आहेत.?महाजन- महापालिकेत त्रिस्तरीय कामकाज पध्दती असून त्यात महासभा, स्थायी समिती आणि आयुक्त असे कामकाज चालते. नगरसेवकांना अधिकार दिले तर त्यात फंक्शनल, फंक्शनल आणि फायनांशीयल असे सर्व प्रकारचे अधिकार देणे प्रस्तावीत आहेत. परंतु असे अधिकार देताना त्यांच्यावर जबाबदारी आली तर ते अधिकार चांगल्या पध्दतीने वापरू शकतील.

प्रश्न-  सध्याच्या नगरसेवकांच्या अधिकारात काही बदल करणे गरजेचे आहे, असे वाटते का?महाजन- अधिकार मागताना नगरसेवकांच्या पात्रतेत देखील बदल करायला हवा. आफ्रीकेत नगरसेवकांची पात्रता किमान पदवीधर, दहा वर्षांच्या कामकाजाचा अनुभव गरजेचा आहे. म्हणजे पदवी घेतल्यानंतर दहा वर्षे म्हंटले तर वय २८ ते ३० वर्षे वय होते. म्हणजेच अनुभव आणि पात्रता दोन्ही अंगी असते. मी हॉलंड मध्ये भेट दिली तेथील महापौर तर आकिटेक्ट होते. अर्धवेळ ते त्यांचा व्यवसाय देखील नियमीतपणे करीत असत. त्यामुळे किमान काही पात्रता ठरल्या तर निश्चीतच अधिकाराबरोबरच या दायीत्वाचा देखील वापर हेाऊ शकेल.

मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारणGovernmentसरकार