शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मनाची मशागत हवी !

By किरण अग्रवाल | Updated: April 1, 2018 08:56 IST

अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या अनेकांची दुकाने खालसा झाली; परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी विज्ञान व विवेकवाद्यांना अजूनही मोठा वाव असल्याचे अलीकडील काही घटनांवरून दिसून यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुण्या कलकीराम महाराजाच्या भक्तांनी आपल्या महाराजाकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून जगभरातील सर्वधर्मीय पवित्रस्थानांवर ...

अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या अनेकांची दुकाने खालसा झाली; परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी विज्ञान व विवेकवाद्यांना अजूनही मोठा वाव असल्याचे अलीकडील काही घटनांवरून दिसून यावे. त्र्यंबकेश्वरमधील कुण्या कलकीराम महाराजाच्या भक्तांनी आपल्या महाराजाकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून जगभरातील सर्वधर्मीय पवित्रस्थानांवर एकाचवेळी पाण्याने दिवे प्रज्वलित करण्याचा दावा केला आहे. विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध न होऊ शकणाºया अशा बाबी अंधश्रद्धा वाढविण्यास कारणीभूत ठरणाºया असून, या भक्तांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चमत्कार करून दाखविण्याचे आव्हानही दिले आहे. परंतु ते होत असताना भोळ्या-भाबड्या जनतेस मूर्खात काढू पाहणाºया अशा घटकांना कायद्याने लगाम घातला जाणेही गरजेचे आहे. यासंबंधीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांनी भंबेरी उडालेल्या भक्तांचा त्यांच्या महाराजांशी संपर्क होऊ न शकल्याने ती पत्रकार परिषद गुंडाळली गेली; परंतु त्यांचा कथित व नियोजित चमत्कार विज्ञानाला आव्हान देणाराच असल्याने सार्वजनिक पातळीवर अनेकांचा वेळ खर्ची पडण्यापूर्वी त्यासंबंधीचा सोक्षमोक्ष होण्याची अपेक्षा गैर ठरू नये. अशा प्रवृत्ती प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे ओढवून घेत, अशिक्षित-अज्ञानी लोकांना जाळ्यात खेचतात असा नेहमीचा अनुभव आहे. तेव्हा, तसे घडून येण्यापूर्वीच बंदोबस्त व्हायला हवा. एकीकडे अवैज्ञानिक चमत्काराचा हा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे लहवित गावातील काही घरांवर दगडफेक झाल्याने त्याबद्दल प्रारंभी भुताटकीचा संशय घेतला गेला. पोलिसांनी याबाबत लागलीच तेथे धाव घेऊन ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करीत, दगडफेक करणाºयास पकडण्याची भाषा केल्याबरोबर हा प्रकार दोन-चार दिवस थांबला; परंतु पुन्हा तोच प्रकार सुरू झाल्याने काहींनी भयापोटी घरातील मंडळीस बाहेरगावी पाठविले आहे. या प्रकारामागे कुणी माथेफिरू असण्याचीच शक्यता व संशय आहे, त्याला हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर असले तरी सदरचा प्रकारही उगाच अंधश्रद्धीय चर्चांना निमंत्रण देणारा ठरला आहे. मागेही सुरगाणा तालुक्यात एका आदिवासी गावात कुणाच्या तरी अंगात येते व तो गावातील जनावरे खातो अशी आवई उठवून दिली गेली होती व त्यातून सदर इसमाचा संशयास्पद मृत्यू घडून आला होता. याप्रकरणातील व्यक्तीच्या सुशिक्षित नातवानेच यासंदर्भात लढा देत अंधश्रद्धा दूर करण्याची भूमिका घेतली होती. पुण्यातील प्रख्यात रुग्णालयात मांत्रिकाकडून उपचार केल्याची जी घटना अलीकडेच समोर आली तसलाच प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातही काही महिन्यांपूर्वी घडला होता. अन्यही अशी अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. तेव्हा, एकूणच समाजातील अंधश्रद्धीय समजांची जळमटे दूर झालेली नसल्याचेच या घटनांतून दिसून येणारे असून, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांसमवेतच विज्ञानवादी व सुजाण नागरिकांनी यासंदर्भात अशिक्षितांच्या मनाची मशागत करण्याची गरज आहे. केवळ कायदे करून अंधश्रद्धा घालवता येणार नाही, तर समाजातील जाणत्यांनाच त्यासाठी जागरणाचा पुढाकार घ्यावा लागेल.

टॅग्स :Nashikनाशिक