शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृती वाढविण्याची गरज : प्रांजली कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:20 IST

आजच्या काळात पुस्तकांकडे वळावे हे सांगणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन प्रांजली कुलकर्णी यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिन साजरे करण्याऐवजी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.

मालेगाव : आजच्या काळात पुस्तकांकडे वळावे हे सांगणे ही शोकांतिका आहे, असे प्रतिपादन प्रांजली कुलकर्णी यांनी केले. कॅम्प सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दिन साजरे करण्याऐवजी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले.  प्रांजली कुलकर्णी म्हणाल्या, पुस्तक वाचनाची आवड व साहित्यिक मंडळींचा सहवास लाभल्याने लेखनासाठी त्याचा उपयोग झाला. वाचनाने कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती वाढते. मीडिया, मोबाइल, टीव्ही व पुस्तकवाचनातील फरक सांगताना टीव्ही, मोबाइलमुळे माणसे एककल्ली होतात व वाचनाने माणसाला माणूस व्हावेसे वाटते हे उदाहरणातून पटवून दिले. पुस्तके खरेदी करून वाचावी, असे आवाहन त्यांनी केले.  याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलनच्या नम्रता जगताप यांचेही भाषण झाले. दर रविवारी लहान मुलांसाठी वाचनालयात कार्यक्र म राबवून त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावेत, असे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सूचित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मंगला देवरे यांनी शेक्सपियरच्या निवासस्थानाला भेट दिल्याचे सांगितले. पुस्तक मोठा गुरु आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश पहाडे, राजेंद्र भामरे, अनिता वाडेकर, किशोर शिंदे, कल्पेश सोनवणे, पूनम सोनपसारे, अनुष जाधव, वासुदेव विसपुते, समाधान शेजवळ, प्रशांत पवार, प्रीतेश सूर्यवंशी, ऋषिकेश देशमुख, पुष्पक पवार, संदीप जाधव, प्रफुल्ल गर्ग, अजय बडाळे, सुरेखा सोनवणे, प्रमोद भावसार, माया गाडेकर आदी उपस्थित होते. यावेळी बालवाचक शृंखल व जान्हवी देवरेचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिव रमेश उचित यांनी केले. आभार ग्रंथपाल रेखा उगले यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक