शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

मधुमेहींना कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:10 IST

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज आवश्यक असायला हवी. निदान झाल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून, उपचारादरम्यान संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे असते.

नाशिक : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रथम आपल्या कुटुंबीयांच्या पाठिंब्याची गरज आवश्यक असायला हवी. निदान झाल्यानंतर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक असून, उपचारादरम्यान संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य असणे गरजेचे असते. मधुमेही रुग्ण ज्याठिकाणी काम करत असेल, त्या ठिकाणच्या सहकाऱ्यांचा सहवासदेखील मधुमेह निवारणाला फायदेशीर ठरतो. मधुमेह हा अतिशय संथरीत्या बळावत जाणारा आजार असल्याने त्याचे निदान वेळीच होणे आवश्यक असल्याचा सूर आरोग्यमंथन या कार्यक्रमात ‘मधुमेह व कुटंब’ या विषयावर परिसंवादातून तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.रोटरीक्लब आॅफ नाशिकतर्फे आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी दर महिन्याला घेण्यात येणाºया आरोग्यमंथन परिसंवादात गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास सभागृहात ‘मधुमेह व कुटुंब’ या विषयावर चर्चा करण्यात आली. आहारात फास्ट फूडचा वापर, अतिआहार, व्यायामाचा अभाव, ही कारणे प्रकर्षाणे जाणवत असल्याने व्यायाम, संतुलित आहार, नियमबद्ध जीवनशैली यावर विशेष भर देण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी मधुमेह तज्ज्ञ डॉ. अजित कुमठेकर, डॉ. मृणाल केळकर, राष्टय मेडिकल असोसिएनचे डॉ. राजेंद्र नेहते, आहारतज्ज्ञ डॉ. रश्मी सोमाणी मंचावर होते. डॉ. रचना चिंधडे यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याशी निगडित प्रश्न तज्ज्ञांना विचारले. प्रश्नोत्तरातून हा परिसंवाद अधिकाधिक खुलत गेला. त्यावेळी तज्ज्ञांनी मधुमेहाचे निदान झाल्यानंतर उपचारपद्धतीत सुसूत्रता ठेवण्यासाठी कुटुंबीयांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष चिंधडे उपस्थित होते.व्यायामाची गरजमधुमेह या आजाराची समस्या वैयक्तिक नसून सामाजिक आहे. गेल्या काही वर्षांत धूम्रपान, तंबाखू सेवन आणि ध्वनी व वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्येत वाढ होत आहे. सध्या ८ टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त असून, दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. देशाचा क्र मांक मधुमेहाच्या रुग्णांमध्ये दुसरा असून, मधुमेह टाळण्यासाठी रोज किमान दहा हजार पावले चालणे गरजेचे आहे. तसेच नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला यावेळी तज्ज्ञांनी दिला.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल