शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:तील दोष नष्ट करण्याची गरज : वेणाभारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:18 IST

समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले.

नाशिक : समाज माध्यमात रमणाऱ्या नागरिकांनी आपल्यातील रावण म्हणजे दोष शोधून ते नष्ट करायला हवेत, तरच हृदयी राम जागेल, असे मत कपालेश्वर मंदिराजवळील कपिकुलपीठम् येथील सद्गुरू वेणाभारती महाराज यांनी व्यक्त केले. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘श्री समर्थ हृदयातील राम’ या विषयावर वेणाभारती महाराज यांचे प्रवचन झाले यावेळी त्या बोलत होत्या. समर्थ हृदयातील राम समजायला साधना हवी, तप हवे, गुरूसेवा घडायला हवी व गुरूकडून ज्ञान घ्यायला हवे. दशमी तिथीची सायंकाळ साधनेसाठी खूप महत्त्वाची आहे, पण आजच्या काळात समाजमाध्यमात रमणारे मन राम नामात लागेल का, अशी शंका व्यक्त करीत स्वत:मधील रावण शोधून म्हणजेच दोष शोधून ते मारायला हवेत, असे विचार मांडले. समर्थांसारखे समर्थ व्हायचे तर रामसेवा हा एकच ध्यास हवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, मंदिराचे विश्वस्त पांडुरंग बोडके यांनी वेणाभारती महाराज यांचा सत्कार केला.वाचा कोमल हवीसमर्थांनी अवघड काळात दारोदारी जाऊन राम नाम जागरण केले, धाडसाने रामकार्य केले, म्हणून गुरू शोधा व त्यांना आपल्या जन्माचे कारण विचारा, असे सांगून त्यांनी हृदयात राम येण्यासाठी मन पूर्ण रिकामे हवे, शुद्ध हवे, कोमल वाचा हवी, स्वत:जवळ शांत बसायला हवे, असेही वेणाभारती महाराज म्हणाल्या.

टॅग्स :Nashikनाशिक