कोरोना अटकावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:51+5:302021-04-04T04:15:51+5:30

येवला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी सामूहिक प्रयत्नातून दुपटीने यंत्रणा विकसित करण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये ...

The need for collective efforts to prevent corona | कोरोना अटकावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कोरोना अटकावासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

Next

येवला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी सामूहिक प्रयत्नातून दुपटीने यंत्रणा विकसित करण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

येथील विश्रामगृहात तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती व करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यकतेनुसार खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. या परिस्थितीत रुग्णांसाठी आवश्यक सुविधा तसेच बेडची संख्या वाढविण्यात यावी. यासोबतच अधिकच्या मनुष्यबळासाठी निवृत्त झालेल्या परिचारिका, नर्स तसेच खासगी लोकांना मानधनावर नियुक्त करण्यात यावे, असे निर्देशदेखील आरोग्य यंत्रणेला भुजबळ यांनी दिले.

विलगीकरणात असलेल्या रुग्णांची नियमित तपासणी करण्यात यावी. ज्या गृहविलगीकरणातील रुग्णांची नियमानुसार व्यवस्था होत नसेल त्या रुग्णांना कोविड केअर सेंटर्समध्ये त्वरित दाखल करण्यात यावे. रुग्णासंख्येच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटर्स वाढविण्यासाठी धर्मशाळा, भक्तनिवास आणि लॉन्स अधिग्रहित करून तेथे कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे संपूर्ण तालुका व शहरातील जे खासगी डॉक्टर्स कोरोनाबधित रुग्णांवर उपचार करत असतील आशा खासगी डॉक्टर्सकडून देखील रुग्णांची नियमित माहिती घेण्याच्या सूचना भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदी उपस्थित होते.

-------------------------

नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई

कोरोनाबधित रुग्ण विलगीकरणाचे नियम न पाळता फिरत असतील अशा रुग्णांवर पोलिसांच्या मदतीने नियंत्रण ठेवण्यात यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेने नियोजनपूर्वक जबाबदारी पार पाडावी. तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी शहरात स्वच्छतेबाबत विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी बैठकीत दिल्या आहेत.

(०३ येवला भुजबळ)

===Photopath===

030421\03nsk_41_03042021_13.jpg

===Caption===

०३ येवला भुजबळ

Web Title: The need for collective efforts to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.