शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानासाठी कला हा सिद्धांत प्रस्थापित होण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:03 IST

कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे,

नाशिक : कलाक लेसाठी हा विचार मागे पडला आहे. याबरोबरच जीवनासाठी कला हा विचारही मान्य होत चालला आहे. बोधी नाट्य परिषदेकडून कलेच्या संदर्भात मांडण्यात आलेला नवा सिद्धांत कौतुकास्पद असून ‘ज्ञानासाठी कला’ हा विचार प्रस्थापित होण्याची खरी गरज भविष्यात आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.  निमित्त होते, मंगळवारी (दि.२५) परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित तिसऱ्या बोधिकला संगितीच्या उद्घाटनाचे. राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ व बोधी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधिकला संगितीच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून देशमुख बोलत होते. विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य-संस्कृती मंडळाचे सदस्य शशिकांत सावंत, अशोक हांडोरे, राज बाळदकर, भगवान हिरे उपस्थित होते.  हांडोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुरेश मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान,‘मराठी साहित्यातील वैचारिकता’ या विषयावर परिसंवाद रंगला.  अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल सपकाळ होते, तर देवेंद्र उबाळे, मुकुंद कुलकर्णी, डॉ. अलका शिंदे-पवार, हरीश इथापे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, चंद्रकांत महामिने, डॉ. बी. जी. वाघ, कवी किशोर पाठक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.रंगले काव्यकार संमेलन व कथाकथन सत्रमनाला भिडणाºया कथा व समाज आणि व्यवस्थेबाबतच्या सत्य परिस्थितीचे चित्रण करणाºया कवितांनी वास्तववादाचे चित्रण करत बोधी कला संगितीच्या दुसºया सत्रात बुधवारी (दि. २६) औरंगाबादकर सभागृहात कपूर वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली काव्यकार संमेलन रंगले. थेट मानवी वृत्तीचे दर्शन घडणाºया साहित्यकृतींनी प्रेक्षकांना अंर्तमुख केले. सोबतच समानतेसाठी विद्रोही भूमिकाही ताकदीने मांडण्यात काव्यकार यशस्वी ठरले. कथाकथनाचा कार्यक्र म ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुरु वातीला लेखक नंदिकशोर साळवे यांनी ‘डंका’ या कथासंग्रहातील ‘थुंकी’, तृतीय पंथीयांच्या आयुष्याची लढाईवर प्रकाश टाकणारी अस्तित्वाची लढाई ही कथा जयश्री बागुल यांनी सादर केली. तर ‘बेवारस’ ही कथा कथाकार रोहित पगारे यांनी सांगितली.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक