शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तांब्यात अडकली मान; दूध पिणे पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:32 IST

बाळासाहेब कुमावत । लोकमत न्यूज नेटवर्क पाथरे : दूध पिण्यासाठी तांब्यात डोके घातल्यानंतर बोक्याचे डोके त्यात अडकल्याची घटना तालुक्यातील पाथरे येथे घडली. तरुणांनी प्रसंगावधान राखत एका बोक्याची तांब्यातून सुटका करून त्याचा जीव वाचविला.

बाळासाहेब कुमावत ।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरे : दूध पिण्यासाठी तांब्यात डोके घातल्यानंतर बोक्याचे डोके त्यात अडकल्याची घटना तालुक्यातील पाथरे येथे घडली. तरुणांनी प्रसंगावधान राखत एका बोक्याची तांब्यातून सुटका करून त्याचा जीव वाचविला.तरुणांनी बोक्याची मरणाच्या दारातून सुटका केली. येथील खासगी पशुवैद्य सतीश गुंजाळ, मकरंद गुंजाळ यांच्या जवळके रस्त्यावरील घराशेजारी सदर घटना घडली. एक बोका छोट्याशा तांब्यात दूध आहे असे समजून दूध पिण्यासाठी गेला. त्याने छोट्याशा तांब्यात मान घातली, पण त्यानंतर त्याने मान बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु त्या बोक्याला त्याची मान बाहेर काढता येत नव्हती. तांब्यातून मान बाहेर काढण्याचा हा प्रकार साधारण चार ते पाच तास चालू होता. बोका तांब्यातून सुटका करत असल्याचे सकाळी सतीश गुंजाळ यांनी प्रथम बघितले. हा प्रकार रात्री उशिरा घडला असावा कारण बोका थकला होता.  बोक्याला तरुणांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु बोका उंच उड्या मारत होता आणि नखांनी ओरबाडीत होता. बोका काट्यांमध्ये इकडे तिकडे बेफान पळत होता. जिवाच्या आकांताने स्वैरवैर झालेल्या बोक्याला पकडणे अवघड झाले होते. त्याचा जीव गुदमरून धोक्यात आला होता. त्यामुळे सतीश गुंजाळ यांनी आपल्याशेजारी नवनाथ गुंजाळ, मंगेश गुंजाळ, संदीप रहाणे, मकरंद गुंजाळ यांना बोलावले. त्यांनी खूप प्रयत्नांनी त्यास पोत्यात पकडले.

टॅग्स :Nashikनाशिक