शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुरळीत पार पडली ‘नीट’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 01:04 IST

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.

नाशिक : बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ४४ केंद्रावर सुरळीत पार पडली. एकूण विद्यार्थ्यांपैकी ८८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर १२ टक्के गैरहजर राहिले. रात्री उशिरा पेपर मुंबईकडे रवाना करण्यात आले.बारावीनंतर पुढील करिअर निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा महत्त्वाची मानली जाते. यंदा बारावीचा निकाल लागून बराच कालावधी उलटून गेल्यावरही कोरोनामुळे ही परीक्षा होण्याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये शंका होती. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा वेगवेगळ्या सत्रा मध्ये घेण्याचे ठरले.त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २0 हजार विद्यार्थ्यांसाठी ४४ केंद्र ठेवण्यात आले होते. दुपारी २ वाजता प्रत्यक्ष पेपर असला तरी, परीक्षा केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजेपासून टाइम स्लॉट देण्यात आला होता. प्रत्येकी ५0 याप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले, त्यामुळे साडेदहा वाजेपासून विद्यार्थी व पालकांची केंद्रावर गर्दी झाली. केंद्राच्या बाहेर मुले व मुली त्यांची स्वतंत्र रांग लावून, त्यात ६ फुटाचे अंतर ठेवण्यात आले होते. गेटवरच विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासून आत पाठविले जात होते, विद्यार्थ्यांना पेन, पॅड, मोबाइल अन्य वस्तू नेण्यास मनाई असल्याने गेटवरच वस्तू काढून घेण्यात आले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शासनाने पेन व मास्क पुरविले तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे हँडसॅनिटाझर करण्यात आले. प्रत्येक वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांची सोय करण्यात येऊन दोन पर्यवेक्षक नेमण्यात आले होते.जिल्ह्यातील सर्व पेपर रात्री उशिरापर्यंत गोळा करण्याचे काम सुरू होते. पेपर गोळा केल्यानंतर ते लगेच मुंबई व तेथून विमानाने दिल्ली येथे पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.पालक केंद्राबाहेरचदुपारी २ वाजता केंद्राचे गेट बंद करण्यात आले. बाहेर गावातून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केंद्राबाहेर वेळ घालविला. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या पैकी ८८ टक्के विद्यार्थी परीक्षेला हजर होते. ५ वाजता पेपर सुटल्यावर सर्वच केंद्रावर पुन्हा गर्दी झाली.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणexamपरीक्षा