शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएसटीकडून ७५ जणांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 14:50 IST

शरद नेरकर/ नामपूर : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या (एनडीएसटी) कर्जावरील व्याज दर साडेआठ टक्के असून तो आठ टक्के करावा अशी मागणी सभासदांकडून होत आहे. दरम्यान, संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक, विद्यमान संचालक आणि कर्मचारी अशा ७५ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

शरद नेरकर/ नामपूर : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या (एनडीएसटी) कर्जावरील व्याज दर साडेआठ टक्के असून तो आठ टक्के करावा अशी मागणी सभासदांकडून होत आहे. दरम्यान, संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक, विद्यमान संचालक आणि कर्मचारी अशा ७५ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा माध्य व उच्य माध्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील जवळपास ११७३६ सभासदांची अर्थवाहिनी आहे. ३० आॅगस्ट १९६२ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेचा कारभार मोठा असून उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य संस्था म्हणून लौकिक आहे. कर्जावरील व्याजदर पूर्वी ९ टक्के होता. प्रशासक असतांना विद्यमान संचालक संजय चव्हाण व राजेन्द्र सावंत यांनी तो ८ टक्के करावा अशी मागणी केली होती. मात्र त्यावेळी तो ८.३० टक्के करण्यात आला होता.यावेळी नफा चांगला आहे.त्यामूळे व्याजदर ८ टक्के करावा ही मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. संस्थेत अनेक संचालकमंडळे आलीत व गेलीत कामकाजाबाबत अनेकांच्या तक्र ारी झाल्यात.अनेकांनी चांगली कामेही केलीत. तर काहीनी स्वार्थापोटी संस्थेचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला.माञ कोणाचा सत्कारही झाला नाही किंवा कुणावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. पतसंस्थेचे सभासद मुळातच सोशिक आहेत.जनरल मिटींगच्या हाणामा-यांचा अपवाद वगळता एरव्ही शांतता असते.सोसायटीला चालू वर्षी सात कोटी नव्वद लाख रु पये इतका नफा झाला आहे. सोसायटीला झालेल्या नफ्यात अध्यक्ष ,उपाध्यक्ष कार्यवाह व संचालक मंडळ तसेच कर्मचार्याचाही सिंहाचा वाटा आहे. संस्थेचे भागभांडवल ८९,०३,९८,५८७ एवढे असून सभासद ठेव १३१,११,३८,९६९ इतकी प्रचंड आहे. पतसंस्था सभासदांना १०,२०,००० कर्ज देते. या संचालक मंडळाने खर्चात मोठी बचत केल्याने नफ्यात वाढ दिसते . तर पूर्वीच्या तुलनेत जनरल मिटिंगचा खर्च निम्याने कमी झाला आहे. अनाठाई वेतनवाढी, व अनावश्यक पदोन्नती रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या संचालक मंडळाने घेऊन वर्षाची मोठी आर्थिक बचत केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक