शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पास मशीन ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:13 IST

रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणा-या गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रेशन धान्य दुकानदार त्यांना धान्य देत नाही.

ठळक मुद्देरेशन धान्यापासून लाभार्थी वंचित : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनस्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे

नाशिक : गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणा-या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचा पाढा वाचत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शरद कोशिरे, निवृत्ती अरिंगळे, अशोक सावंत, संजय खैरनार, अशोक पाटील मोगल, मनोहर बोराडे, बाळासाहेब मते यांनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणा-या गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रेशन धान्य दुकानदार त्यांना धान्य देत नाही. त्यामुळे गरीब जनतेला पोटाला चिमटा देत जीवन जगावे लागत आहे. तसेच स्वस्त धान्य घेणा-या नागरिकांमध्ये मोलमजुरी व धुणीभांडी करणा-या महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले आहेत. त्यांच्या बोटांचे ठसे पीओएस मशीनमध्ये येत नसल्याने संबंधित अधिकारी येईपर्यंत नागरिकांना चार-चार तास रेशन दुकानांसमोर ताटकळत उभे रहावे लागत असल्याने त्यांचा दिवसाचा रोजगार बुडत आहे.पीओएस मशीनवर बहुतांशी कार्डधारकांची नावेच नाहीत, तर ज्यांची नावे आहेत त्यांच्या बोटांचे ठसे मशीनमध्ये जुळत नाही. त्यातच मशीनला अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याने गोरगरिबांना स्वस्त धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. तसेच गरीब जनतेला या पद्धतीने धान्य घेताना काही अडचणी येऊ नये व आल्यास त्या सोडविण्याकरिता अधिका-यांची नेमणूक केली आहे. मात्र हे अधिकारी कुठेच फिरताना दिसत नसल्याने व जनतेला यातील काही माहिती नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या सर्व समस्या शासनाने त्वरित सोडवाव्यात व आधार कार्डची १०० टक्के नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गरजू लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच धान्य वाटप करावे अन्यथा रेशन दुकानातील पीओएस मशीन ताब्यात घेत तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी जयप्रकाश गायकवाड, अ‍ॅड. चिन्मय गाढे, मकरंद सोमवंशी, राजेश जाधव, प्रफुल्ल पाटील, नवराज रामराजे, संतोष भुजबळ, मुन्ना अन्सारी, मुस्ताक शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक