शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 16:46 IST

चांदवड : शेतमालाला हमी भाव देण्याची मागणी, कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध चांदवड - कांदा व अन्य शेतीमालाला हमीभाव ...

चांदवड : शेतमालाला हमी भाव देण्याची मागणी, कांदा रस्त्यावर ओतून सरकारचा निषेधचांदवड - कांदा व अन्य शेतीमालाला हमीभाव जाहीर करुन दिलासा द्यावा या मागणीसाठी चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने मुंबई -आग्ररोडवर पेट्रोलपंप चौफुलीवर मंगळवारी सकाळी अर्धातास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ,डॉ. भारती पवार,माजी आमदार जयंत जाधव, तालुका अध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड,कादवाचे संचालक सुखदेव जाधव, खंडेराव आहेर, विजय जाधव आदिनी केले. यावेळी नायब तहसीलदार मिनाक्षी गवळी, पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दिेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसुल होत नाही. सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन कांदा व अन्य शेतमालाला तातडीने हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी निवेदनात करुन कांद्याचे निर्यात मुल्य शुन्य असतांना देखील कांद्याला १५० ते २०० रुपये क्विंटल एवढी कवडीमोल किमंत मिळत आहे. शेतमालाचे दर वाढल्यावर भाव खाली येऊन स्थिर राहावे यासाठी सरकारतर्फे बाजार हस्तक्षेप योजना राबवुन दर खाली आणले जातात. त्याचप्रमाणे कांद्याचे भाव अत्यंत कमी झले आहेत. शेतकºयांचे उत्पादन शुल्क देखील वसुल होत नसल्याने शेतकरी प्रचंड हतबल झाला असून आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्हयात शेतकºयांचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवुन कांद्याला किमान २००० रुपये हमी भाव जाहीर करावा अन्यथा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस कमेटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.आंदोलनात प्रेरणा बलकवडे,बाळासाहेब कर्डक,युवक जिल्हाध्यक्ष पुरु षोत्तम कडलक,राधाकृष्ण सोनवणे, सुनील आहेर, संजय बनकर, जितेंद्र आहेर, राजू पगारे, राईस फारूकी, संजय भाबर, रघुनाथ अहेर, शहाजी भोकनळ, उत्तम आहेर, अल्ताप तांबोळी, प्रकाश शेळके, निवृत्ती घाटे,अरु ण न्याहारकर,खंडेराव अहेर, सुनील कबाडे, अमोल भालेराव,रिजवान घासी,अ‍ॅड. नवनाथ अहेर,तुकाराम सोनवणे, नवनाथ जाधव, अनिल पवार, बाळासाहेब माळी, विजय जाधव,अनिल काळे, दत्तात्रय वाकचौरे, अनिल पाटील,महेश न्याहारकर, सौरभ ठाकरे, आबा ठाकरे, म्हसु गागरे, रुपम कोतवाल, राजाभाऊ भालेराव, कैलास गांगुर्डे,विजय गांगुर्डे, देवमन पवार, तुकाराम खैरे ,छबु गांगुर्डे आदिसह कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्व नेते व कार्यकर्ते चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत जमुन मोर्चाने रास्तारोको स्थळी गेले. यावेळी चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील , पोलीस, राखीव जवानांनी , दंगा पथकांने चोख बंदोबस्त ठेवला.