शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाला राष्ट्रवादीचा घेराव

By श्याम बागुल | Updated: August 27, 2018 18:29 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला.

ठळक मुद्देआठ दिवसांत भरणार खड्डे : टोल बंद करण्याचे तोंडी आश्वासनआठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले.मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला. यावेळी प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद केला जाईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे (जि. ठाणे) ते धुळे हा मार्ग बीओटीद्वारे चौपदरी करण्यात आलेला असूनही त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून या रस्त्याची चाळण झालेली आहे. कल्याण फाटा ते वडपे (जि. ठाणे) या लांबीतील रस्त्याचीदेखील अशीच दुर्दशा झालेली असून, त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत टोल कंपन्यांकडून हा रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत या रस्त्यावरील टोल तत्काळ बंद करावा. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने टोल बंद पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, मुख्तार शेख, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, हिरामण खोसकर, सुषमा पगारे, समीना मेमन, किशोरी खैरनार, संजय खैरनार, बाळासाहेब गिते, सुरेखा निमसे, जीवन रायते, दत्ता पाटील, सुनील अहिरे, दादा कापडणीस, पूनम शहा, ज्ञानेश्वर पवार, रंजना गांगुर्डे, चिन्मय गाढे, मुकेश शेवाळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक