शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

By admin | Updated: August 7, 2014 01:59 IST

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

 

नाशिक : समवयस्क विद्यार्थिनीने नाव विचारून रॅगिंग केल्याचा आरोप करीत बुधवारी सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसशी व विशेष करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित तरुणांनी सातपूर औद्योगिक वसाहतीतील आयडिया आर्किटेक्चर महविद्यालयात धुडगूस घातला. लाठ्या-काठ्या व दगडफेकीने कार्यालयाच्या काचा फोडून खुली दहशत तर माजविलीच; पण महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापकांच्या नावे लाखोली वाहत यथेच्छ धुमाकूळ घातला. ज्या विद्यार्थिनीवर रॅगिंग झाली अशी तक्रार आहे, ती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांची कन्या आहे. पोलिसांनी मात्र दहा ते पंधरा अज्ञात तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल करून आपल्या मर्दुमकीचे प्रदर्शन घडविले. सोमवारपासून यासंदर्भातील वाद धुमसत होता. राष्ट्रवादीच्या एका आमदाराने व बड्या पदाधिकाऱ्यानेच या प्रकरणात लक्ष घातल्याने घटनेचे गांभीर्य वाढले होते. प्रकरण मिटले म्हणून महाविद्यालय व्यवस्थापन गाफील असतानाच सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला.