शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सोनवणे यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:14 IST

येवला : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाचा येथील भागवत सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्या सोबत राष्ट्रवादीच्या प्राथमिक तसेच सक्रि य सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्याकडे सुपूर्द केला असून याची प्रत आमदार छगन भुजबळ यांना पाठवली आहे.

ठळक मुद्देयेवला : तालुक्यातील सर्व प्रलंबित सिंचन प्रश्न न सोडविल्याने नाराज

येवला : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पदाचा येथील भागवत सोनवणे यांनी राजीनामा दिला आहे. त्या सोबत राष्ट्रवादीच्या प्राथमिक तसेच सक्रि य सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. हा राजीनामा सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्याकडे सुपूर्द केला असून याची प्रत आमदार छगन भुजबळ यांना पाठवली आहे.येवला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सन २०१४ पासून ते सक्र ीय होते. तालुक्यातील सर्व प्रलंबित सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी मदत करु अशी भुमिका तत्कालीन पालकमंत्री भुजबळ यांनी घेतल्याने ममदापूर येथील साठवण बंधाऱ्याच्या भुमिपूजन प्रसंगी सोनवणे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भुमिपूजनानंतर ५ वर्ष लोटली तरी ममदापूर येथील साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागला नाही. सोनवणे यांनी पाठपुरावा करु न तालुक्यातील अनेक सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण, अन्वेन्शन, सविस्तर प्रकल्प अहवाल, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आदींचा पाठपुरावा करु न प्रकल्प मार्गी लावले होते. राष्ट्रवादीची राज्यात पुन्हा सत्ता येईल आणि भुजबळांच्या मदतीने तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रश्न सोडवता येईल अशी सोनवणे यांना आशा होती. मात्र २०१४ ला राष्ट्रवादीची सत्ता गेली. हेवीवेट नेते असूनही त्यानंतर सिंचन प्रश्न जैसे थे राहिले. सध्याच्या भाजपा-शिवसेना युती सरकारनेही भुजबळांच्या मतदार संघात असहकाराची भुमिका ठेवली. यामुळे देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्प रखडला. येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागाला अपेक्षा असलेल्या पुणेगाव-डोंगरगाव कालव्यालाही पाणी आले नाही. जनतेला विविध निवडणुकांमध्ये दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करता आली नाही. याची खंत म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचे सोनवणे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.