शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

नायगाव घाट बनला कचरा डेपो

By admin | Updated: January 11, 2017 00:10 IST

नायगाव घाट बनला कचरा डेपो

नायगाव : सिन्नर - सायखेडा रस्त्यावरील नायगाव घाट गेल्या अनेक दिवसांपासून माळेगाव औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचा कचरा डेपो बनल्याचे चित्र आहे. थेट रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने घाटाचे विद्रूपीकरण होण्यासह वाहतुकीसही अडथळा ठरत आहे.  माळेगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांकडून टाकावू वस्तू व कचरा नायगाव घाट परिसरातील टेकडीवर किंवा रस्त्याच्या कडेला सर्रासपणे टाकून दिला जात आहे. या कचऱ्याचे प्रमाणही मोठे राहत असल्यामुळे तो अनेकदा मोठ्या वाहनांमध्ये भरून आणला जातो. कधी हा कचरा पेटवून दिल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरून प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या पेटविलेल्या कचऱ्यामुळे परिसरातल्या डोंगरावरील जनावरांचा चाराही  जळून खाक होण्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन किलोमीटरच्या परिसरात कचरा टाकण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याने घाटाच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. संपूर्ण घाट हा हिरवाईने नटलेला डोंगराच्या कुशीत नागमोडी वळणे असलेला रस्ता आणि तळाशी असलेला जलाशय व परिसरातील हिरवीगार शेतशिवार यामुळे पर्यटकांना भुरळ घालतो. याशिवाय घाटातील महादेव मंदिरामुळे येथे भाविकांची वर्दळ असते. शनिवार-रविवार तर घाट परिसर हमखासपणे पर्यटकांनी गजबजून गेलेला दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून टाकण्यात येणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे घाटाच्या सौंदर्याला दृष्ट लागली आहे. घाटातील प्रत्येक वळणावर कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत.  कचऱ्याबरोबरच अनेक कारखान्यांतून अधून-मधून सोडण्यात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुराने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करून घाट परिसरात दुर्गंधीमुक्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)