शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:48 IST

मोसम खोºयातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, सजावट, आकर्षक रंगरंगोटी, रंगकाम करण्यात आले आहे. उत्सव काळात विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाल्याची माहिती क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष रमाकांत कंकरेज यांनी दिली. नवरात्र काळात शहरातील ७० पेक्षा अधिक महिला घटी बसल्या आहेत.

नामपूर : मोसम खोºयातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम, सजावट, आकर्षक रंगरंगोटी, रंगकाम करण्यात आले आहे. उत्सव काळात विविध कार्यक्रमांनी सुरुवात झाल्याची माहिती क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष रमाकांत कंकरेज यांनी दिली. नवरात्र काळात शहरातील ७० पेक्षा अधिक महिला घटी बसल्या आहेत. नवरात्र काळात श्रीराम, आनंद, आशीर्वाद, शिवछत्रपतीनगर, योगायोग, सप्तशृंगी, जय बजरंग, एकलव्य, इंदिरानगर, त्रिशूल आदी सार्वजनिक ठिकाणी भगवतीच्या विविध रूपांची स्थापना करण्यात आली असून, उत्सव काळात दांडिया स्पर्धा होणार आहेत. नवरात्रीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. शहरातील कुंभार आळी परिसरात आदिमायेच्या विविध रूपांच्या मूर्ती साकारण्यात आल्या असून, मूर्तींचे भाव स्थिर असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. नवसाला पावणारी व जागृत देवस्थान म्हणून येथील त्रिशूल चौकातील दुर्गामाता मंदिराची ओळख आहे. दुर्गामाता व जगदंबा माता या दोन्ही आदिमाया एकाच मंदिरात विराजमान झाल्या आहेत. नवरात्रकाळात नामपूरसह परिसरातील द्याने, उत्राणे, आसखेडा, मळगाव भामेर, बिलपुरी, अंबासन, काकडगाव, खिरमानी, कोटबेल, गोराणे, खामलोण, श्रीपुरवडे, इजमाने आदी गावांमधील हजारो भाविक नवस फेडण्यासाठी येथे येतात. उत्सव काळात मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते. क्षत्रिय समाजाचे प्रतिष्ठित व्यापारी अंबादास वाखारे, आण्णासा कोकणे, रामभाऊ कंकरेज, दामोदर कोकणे आदींच्या पुढाकारातून १९५३ साली दुर्गामाता मंदिराची स्थापना झाली.  गेल्या ६४ वर्षांपासून नवरात्र काळात तीन वेळा आरत्या, भजन, प्रवचन, घटस्थापना, अष्टमीचा होम आदी धार्मिक कार्यक्रमांचा जागर अविरतपणे सुरु आहे. नामपूर शहर क्षत्रिय समाजाच्या वतीने मंदिराचे व्यवस्थापन केले जाते. लोकसहभागातून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष रमाकांत कंकरेज यांच्या हस्ते आदिमायेची विधिवत पूजा करण्यात आली. अष्टमीच्या होमनिमित्त गुरुवारी (२८) एकदिवसीय यात्रा होईल.