शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीबेजच्या युवकाची जिल्हाधिकारीपदाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:15 IST

नागरी सत्कार : भूमिपुत्रांची गावातून काढली मिरवणूक

ठळक मुद्देनवीबेजचा नातू तेजस पगार याने तालुक्यात पहिला आयएएस होण्याचा मान मिळविला होता.

कळवण -तालुक्यातील नवीबेज येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र नवजीवन विजय पवार याने वयाच्या २३ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३१६ वे रॅँकींग मिळवून पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचा मान मिळवित जिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. त्याबद्दल नवीबेज ग्रामस्थांच्यावतीने नवजीवनच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नवीबेजचा नातू तेजस पगार याने तालुक्यात पहिला आयएएस होण्याचा मान मिळविला होता. आता त्यापाठोपाठ यश संपादन करणाऱ्या नवीबेजच्या नवजीवन पवार याचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कारऔरंगाबाद विभागाचे निवृत्त महसूल आयुक्त पुरु षोत्तम भापकर यांच्या हस्तेू करण्यात आला. यावेळी नवजीवनचे वडील विजय पवार आणि आई जयश्री पवार यांचाही सत्कार करण्यात आला. त्यासबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला मटाणे येथील जयेश आहेर ,मेशी येथील निकेतन कदम ,सांगली येथील निलेश कुंभार व नाशिकरोड येथील रियाझ अहमद यांचाही सत्कार मविप्रचे माजी सभापती नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. नवीबेज गावातून आयएएस झालेल्या नवजीवन पवार, जयेश आहेर निकेतन कदम ,निलेश कुंभार रियाझ अहमद यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार डॉ राहुल आहेर, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, माजी प्राचार्य जे. एस. पवार, वसाकाचे माजी संचालक बाजीराव पवार , मविप्रचे माजी उपसभापती विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती सभापती धनंजय पवार आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावाशी नाळ तुटायला नकोयावेळी पुरु षोत्तम भापकर यांनी सांगितले, की मनात जिद्द ,दृढ आत्मविश्वास ,मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही स्वप्न सहज साध्य करता येऊ शकते. पालकांनी आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देऊन स्पर्धा परीक्षा देणे गरजेचे आहे . आपल्या मुलांना कोणती दिशा द्यायची याचा विचार पालकांनी करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळाले तरी गावची नाळ तुटायला नको, असेही भापकर म्हणाले.

टॅग्स :Nashikनाशिक