शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

देवी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप

By admin | Updated: October 8, 2016 00:30 IST

नवरात्रोत्सव : सिन्नर, निफाड, ओझरला विविध कार्यक्रमांचे आयोजन

 निफाड : परिसरातील दहा गावांमधील एकूण २६ मंडळांनी देवीमूर्तींची स्थापना केली आहे. निफाड मार्केट यार्ड येथील अजिंक्ययोद्धा मित्रमंडळ, कोळवाडीरोड येथील रायगड मित्रमंडळ, भवानी चौकातील एकता मित्रमंडळ, शांतीनगर येथील सप्तशृंगी देवी ट्रस्ट, कापसे गल्लीतील कापसे फे्रण्ड सर्कल, जनार्दनस्वामीनगर येथील शिवनेरी मित्रमंडळ, अकोलखास गल्लीतील बजरंग मित्रमंडळ, राजीव गांधी नगर येथील जय मातादी मित्रमंडळ, गणेशनगरमधील रामराज्य युवा प्रतिष्ठान, कृष्ण मंदिराजवळील महाराणा प्रताप मित्रमंडळ, अगस्तीनगर येथील गजराज मित्रमंडळ, तसेच गायत्रीनगर मित्रमंडळ, उमिया मित्रमंडळ, शंकरनगर मित्रमंडळ आदि १४ मंडळांनी देवीमूर्तींची स्थापना केली आहे.तसेच उगाव, कुंदेवाडी, वनसगाव, खेडे, दिंडोरी तास, कोठुरे, शिवडी, पिंपळस, पिंप्री नांदूरमधमेश्वर येथेही विविध मंडळांनी देवीमूर्तींची स्थापना केली आहे.निफाड येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील शांतीनगरनिवासिनी सप्तशृंगी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसरात व मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्यातील फुलांची केलेली आरास लक्ष वेधून घेत आहे. रोज सकाळी ७ व सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या देवीच्या आरतीला महिलावर्ग हजेरी लावत आहे. मंदिरातील नवरात्रोत्सवाला ३८ वर्षांची परंपरा लाभली आहे. कै. शांतीलालजी सोनी यांनी मंदिरात सुरू केलेली नवरात्रोत्सव परंपरा शांतीनगर कला व क्रीडा मित्रमंडळाच्या तरुण पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात सुरू ठेवली आहे. निफाड शहर आणि परिसरातील हजारो भाविक तसेच औरंगाबाद, नाशिककडे खासगी वाहनाने प्रवास करणारे भाविक श्रद्धेने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. संगमरवराची देवीची प्रसन्न मूर्ती भाविकांना समाधान देऊन जाते.निफाड शहरात असलेल्या उगावकर वाड्यातील रेणुकामाता, नांदुर्डीरोडवर व कोर्टाच्या आवारातील लक्ष्मी देवी मंदिर आणि उपजिल्हा रुग्णालयाजवळील देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली आहे.शहरात काही तरुण मंडळांनीही देवीची स्थापना केली आहे. मार्केट कमिटी आवारात अजिंक्ययोद्धा ग्रुप व उगावरोडवरील रायगड ग्रुपने आनंद मेळ्याचे आयोजन केले आहे. या आनंद मेळ्यात रहाट पाळणा, टोरा टोरा, ब्रेक डान्स आदि पाळण्याचे प्रकार, लहान मुलांचे मनोरंजन करणारी खेळणी यामुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी देवी दर्शनासाठी आलेले भाविक आवर्जून मेळ्यास भेट देऊन पाळणे खेळण्याचा आनंद लुटत आहेत. शहरातील मोठ्या मंडळांनीसुद्धा विद्युत रोषणाई केली आहे. शांतीनगर येथील देवी मंदिरात नवमीच्या दिवशी चंडियागाचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने देवी मंदिर पटांगणावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.