नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि.६) संध्याकाळनंतर धडकणार आहे. सध्या नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात चक्रीवादळाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने अग्निशमन दलाच्या सर्व जवानांच्या रजा रद्द केल्या आहेत. पुढील दोन दिवस कोणीही रजा घेणार नसून ‘अॅलर्ट’ जारी केला आहे.बुधवारी दिवसभर पावसाची संततधार शहरात सुरू आहे. दुपारी चार वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत जोरदार पावसाने तडाखा शहराला दिला. तासभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा साडेसहा वाजेपासून शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. अग्निशमन दलाचे मुख्यालयात २५फायरमन, ८बंबचालक सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांनी सज्ज आहेत.तसेच उपकेंद्रांनवरही सर्व सामुग्री अद्ययावत ठेवण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. पेट्रोल कटरसाठी पेट्रोलचा अतिरिक्त साठाही तयार ठेवण्यात आला आला आहे. तसेच मुख्यालयाचे ‘हॅजमेट’ ंबंबही सज्ज असून मोठी दुर्घटना घडल्यास हॅजमेट बंब तत्काळ घटनास्थळी रवाना होऊ शकतो. तसेच सध्या ‘देवदूत’ या आधुनिक हलक्या बंबाद्वारे झाडांच्या फांद्या हटविण्यासह अन्य कामे केली जात आहेत. दिवसभर अग्निशमन दलाच्या मुख्यालयात दुरध्वनी खणखणत होते.
‘निसर्ग’ वादळ : नाशिक अग्निशमन दलाच्या रजा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 18:53 IST
अग्निशमन दलाचे मुख्यालयात २५फायरमन, ८बंबचालक सर्व अत्यावश्यक सोयीसुविधांनी सज्ज आहेत.तसेच उपकेंद्रांनवरही सर्व सामुग्री अद्ययावत ठेवण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.
‘निसर्ग’ वादळ : नाशिक अग्निशमन दलाच्या रजा रद्द
ठळक मुद्देमुख्यालयात २५फायरमन, ८बंबचालक सज्ज