नाशिक : येथील पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सकाळी तैनात करण्यात आल्याने बाजार समितीला जणू पोलीस छावणीचे स्वरुप पहावयास मिळत आहे. सकाळी काही कार्यकर्त्यानी प्रवेशद्वारावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. यानंतर पोलिसांनी धाव घेत प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. राज्य राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले आहे. विनापरवाना कोणालाही बाजारसमितीच्या आवारात निदर्शने करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कुठल्याहीप्रकारे निदर्शने विनापरवानगीने केल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे बाजारसमितीत शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शेतकरीराजा आज बाजारसमितीकडे फिरकलाच नाही, यामुळे बाजारसमितीत निरव शांतता पसरलेली पहावयास मिळत आहे. दरम्यान, बाजारसमितीच्या आवारात निदर्शने वगैेरे होऊ नय, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पंचवटी पोलीस ठाण्यासह स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीव दलाच्या काही जवानांनाही येथे पाचारण करण्यात आले आहे.
पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:31 IST
बाजारसमितीच्या आवारात निदर्शने वगैेरे होऊ नय, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून चोख पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे
पंचवटीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलीस छावणीचे स्वरुप
ठळक मुद्देद्वारका चौफुलीवरही फौजफाटाविनापरवानगीने निदर्शने केल्यास पोलिसांकडून कारवाई