अभोणा : निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधत येथील निसर्ग प्रेमींनी आपल्या चिमुकल्यांसह एकत्र येत अभोणे नजीकच्या कुंडाणे परिसराच्या डोंगरमाथ्यावरील माळरानात मोह, वेळू, चिंच, आवळा, सिसव आदि विविध प्रजातिच्या झाडांसह सुमारे ६०० सीताफळ बियांचे रोपण केले.यावेळी पर्यावरण संतुलनासाठी त्याचबरोबर निसर्गाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वृक्षारोपण व संवर्धन याविषयी निसर्ग व पर्यावरण शिक्षण विकास संस्थेचे प्रमुख डॉ. किशोर कुवर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभोणा परिसरातील डोंगरांवर रानमाळ फुलविण्याचा निर्धार करत वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे लहान मुलांप्रमाणे संगोंपन करण्याची प्रत्येकाने शपथ घेतली.यावेळी राज ठाकरे, विशाल मगर, कृष्णा पाटील, भरतपाटील, चेतन हिरे, अद्यापक विद्यालयाचे प्राचार्य रविंद्र मोरे, जनसंपर्क अधिकारी गोरख खैरनार, विजयानंद ठाकरे, दिपक बच्छाव, सत्येंद्र पवार, कमलाकर दुमसे आदी उपस्थित होते. (फोटो ०५ अभोणा)
पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले निसर्गप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:18 IST
अभोणा : निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधत येथील निसर्ग प्रेमींनी आपल्या चिमुकल्यांसह एकत्र येत अभोणे नजीकच्या कुंडाणे परिसराच्या डोंगरमाथ्यावरील माळरानात मोह, वेळू, चिंच, आवळा, सिसव आदि विविध प्रजातिच्या झाडांसह सुमारे ६०० सीताफळ बियांचे रोपण केले.
पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले निसर्गप्रेमी
ठळक मुद्देवृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे लहान मुलांप्रमाणे संगोंपन करण्याची प्रत्येकाने शपथ घेतली.