शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव परिसराला तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:28 IST

आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देमालेगाव : डी. के. कॉर्नर भागात पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने दुर्गंधी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सोयगाव : आॅक्टोबर अखेरीस झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले पण आता पावसाळा उलटून बरेच दिवस झालेत तरीही डीे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.या भागाकडे उतार असल्याने कृषी नगर, चर्चगेट भागातील पाणी या भागात वाहत येते. तसेच पाण्यामुळे रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. तसेच दाभाडी, रोकडोबानगर या ग्रामीण भागातील लोकांचाही या रस्त्याने वावर असतो. तसेच शाळकरी मुले, नोकरदार यांनाही याचा सामना करावा लागतो. खड्ड्यांच्या पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यालगत नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात असल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.नवीन वाहनचालकांना माहित नसल्याने पडझड तर नेहमीची झाली आहे. रिकाम्या प्लॉटवर पाणी साचून दुर्गंधी, किटक डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. मोकाट प्राणी येऊन घाण करतात. घराबाहेर पाऊल ठेवताच पाण्याचा संघर्ष करावा लागतोच. अनेक वेळा मोठ्या गाड्या बंद पडतात तसेच रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजुने पथदीप नसल्याने अंधार राहतो यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. तरीही पालिका महापालिका प्रशासनाला जाग आली नाही. तरी लवकरात लवकर पाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.उपमहापौरांकडून समस्या सुटण्याची अपेक्षासोयगाव येथील डे. के. कॉर्नर ते सबस्टेशन रस्त्यावर पाणी साचले असून, तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशी परिस्थिती फक्त याच भागातील नसून सोयगावसह संपूर्ण शहरात आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे बºयाच ठिकाणी खड्ड्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांसह पायी चालणाºया नागरिकांना कसरत करावी लागते. रस्त्याने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गटार काम नळजोडणी अशा अनेक कामांसाठीदेखील रस्ते खोदले जातात. तसेच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तक्रारी करुनही महानगरपालिकेसह स्थानिक नगरसेवकदेखील या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कचरा, दुर्गंधी अशा समस्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समस्यांचा ग्रामीण भागातील लोकांनाही त्रास सहन करावा लागतो. सोयगावातील नववसाहत, शिव कॉलनी, चर्चगेट रोड, मित्रनगर, एकतानगर अशा भागात मोठ्या समस्या आहेत. उपमहापौर ही सोयगाव येथील असल्याने लवकरच विकासकामे होतील अशी आशा नागरिकांमध्ये आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकWaterपाणी