शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पॉस मशीन ताब्यात घेण्याचा राष्टवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:22 IST

गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नाशिक : गोरगरीब जनतेच्या रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा, याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. परंतु पीओस मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, रेशन दुकानावर स्वस्त धान्य घेण्यासाठी गरीब जनतेला प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांचा पाढा वाचत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शरद कोशिरे, निवृत्ती अरिंगळे, अशोक सावंत, संजय खैरनार, अशोक पाटील मोगल, मनोहर बोराडे, बाळासाहेब मते यांनी निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.  रेशन धान्य दुकानातील धान्य वाटपात गोंधळ निर्माण झाला असून, स्वस्त धान्य घेणाºया गरीब जनतेला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गरीब कुटुंबातील रेशन कार्डधारकांची नावे आधार कार्ड देऊनही लिंक न झाल्याने तसेच काहींच्या बोटांचे ठसे मशीनशी जुळत नसल्याने रेशन धान्य दुकानदार त्यांना धान्य देत नाही. त्यामुळे गरीब जनतेला पोटाला चिमटा देत जीवन जगावे लागत आहे. तसेच स्वस्त धान्य घेणाºया नागरिकांमध्ये मोलमजुरी व धुणीभांडी करणाºया महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले आहेत. त्यांच्या बोटांचे ठसे पीओएस मशीनमध्ये येत नसल्याने संबंधित अधिकारी येईपर्यंत नागरिकांना चार-चार तास रेशन दुकानांसमोर ताटकळत उभे रहावे लागत असल्याने त्यांचा दिवसाचा रोजगार बुडत आहे.  पीओएस मशीनवर बहुतांशी कार्डधारकांची नावेच नाहीत, तर ज्यांची नावे आहेत त्यांच्या बोटांचे ठसे मशीनमध्ये जुळत नाही. त्यातच मशीनला अनेकदा नेटवर्क मिळत नसल्याने गोरगरिबांना स्वस्त धान्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. रेशन धान्याचा काळाबाजार न होता गरीब रेशन कार्डधारकांना योग्य लाभ मिळावा याकरिता पीओस मशीनच्या आधारे धान्य वाटप केले जात आहे. तसेच गरीब जनतेला या पद्धतीने धान्य घेताना काही अडचणी येऊ नये व आल्यास त्या सोडविण्याकरिता अधिकाºयांची नेमणूक केली आहे. मात्र हे अधिकारी कुठेच फिरताना दिसत नसल्याने व जनतेला यातील काही माहिती नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.  यावेळी जयप्रकाश गायकवाड, अ‍ॅड. चिन्मय गाढे, मकरंद सोमवंशी, राजेश जाधव, प्रफुल्ल पाटील, नवराज रामराजे, संतोष भुजबळ, मुन्ना अन्सारी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस