शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर राष्टवादीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:14 AM

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले.

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडपे ते धुळे रस्त्यावरील खड्डे आठ दिवसांत भरण्यात येतील. खड्डे न भरल्यास आठ दिवसांनंतर टोल बंद करू आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देऊ, असे तोंडी आश्वासन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांना दिले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे ते धुळे या चौपदरी रस्त्याची दुरवस्था झाली असून, गेल्या आठवड्यात घोटीजवळ खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे तोपर्यंत टोल बंद करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जवळपास दीड तास ठिय्या मांडला.  यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील वडपे (जि. ठाणे) ते धुळे हा मार्ग बीओटीद्वारे चौपदरी करण्यात आलेला असूनही त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून या रस्त्याची चाळण झालेली आहे. कल्याण फाटा ते वडपे या लांबीतील रस्त्याचीदेखील अशीच दुर्दशा झालेली असून, त्यामुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत टोल कंपन्यांकडून हा रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोपर्यंत या रस्त्यावरील टोल तत्काळ बंद करावा. येत्या आठ दिवसांत या रस्त्याची सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने टोल बंद पाडला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, मुख्तार शेख, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, धनंजय निकाळे, हिरामण खोसकर, सुषमा पगारे, समीना मेमन, किशोरी खैरनार, संजय खैरनार, बाळासाहेब गिते, सुरेखा निमसे, दादा कापडणीस, पूनम शहा, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांसमवेत चर्चायावेळी प्राधिकरणचे अधिकारी प्रशांत खोडसकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आठ दिवसांत रस्त्यावरील खड्डे भरले जातील अन्यथा टोल बंद केला जाईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :tollplazaटोलनाकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस