शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:32 IST

नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची

राष्ट्रवादी कॉँग्रेस : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननाशिक : नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची गरज काय? असा प्रश्न नाशिककरांना पडलेला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यांना खुश करण्यासाठी शासनाने अभ्यास न करता हा निर्णय घेतला असून, त्याची किंमत तहानलेल्या दत्तक नाशिककरांना चुकवावी लागणार आहे. शासनाने नाशिकच्या दुष्काळी जिल्ह्यातील परिस्थितीचा अभ्यास करावा व त्यानुसार जनहितार्थ पुढील निर्णय घ्यावा. नाशिककरांवर अन्याय होणारा निर्णय जलसंपदा विभागाने घेऊन जायकवाडी धरणास पाणी सोडले तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अ‍ॅड. चिन्मय गाढे, रोहन नहिरे, किरण मानके, नवराज रामराजे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, भूषण गायकवाड, सुनील घुगे, राकेश जाधव, योगेश लगरे, रोहित जाधव, राज रंधावा, राहुल घोडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक