शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल स्पेस सोसायटीचे  ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:49 IST

अंतराळ संशोधनासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नामांकित नॅशनल स्पेस सोसायटीचे पूर्णपणे स्वतंत्ररीत्या कार्यान्वित असे ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला सुरू करण्यात आल्याची माहिती चॅप्टरचे सचिव स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी दिली.

नाशिक : अंतराळ संशोधनासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नामांकित नॅशनल स्पेस सोसायटीचे पूर्णपणे स्वतंत्ररीत्या कार्यान्वित असे ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला सुरू करण्यात आल्याची माहिती चॅप्टरचे सचिव स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी दिली.नॅशनल स्पेस सोसायटीचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. अंतराळ संशोधन व विकासासाठी जागतिक स्तरावरील ही कार्य करणारी संस्था आहे. नासा, इसा यांसारख्या विविध संस्था या संस्थेच्या सदस्य आहेत. अंतराळ क्षेत्रातील वैज्ञानिक या संस्थेचे सदस्य असतात. या जागतिक संस्थेमध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित विविध देशांमधील तज्ज्ञांना सदस्य म्हणून माहिती दिली जाते. स्थानिक कें द्र (लोकल चॅप्टर) सर्वच देशात आहे. भारतातील चंदीगढ व कोलकाता येथे या संस्थेचे केंद्र आहे. महाराष्टÑात प्रथमच नाशिक येथे पूर्णपणे कार्यान्वित असलेले केंद्र म्हणून अलीकडेच मान्यता देण्यात आली आहे.  ‘नॅशनल स्पेस सोसायटी, नाशिक इंडिया चॅप्टर’ असे नाव स्थानिक केंद्राला देण्यात आले आहे. इस्त्रोचे माजी वैज्ञानिक अभियंता अविनाश शिरोडे यांची नाशिकच्या या केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांची नियुक्ती तसेच अभियंता विजय बाविस्कर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाखडी या जागतिक संस्थेचे मागील सात वर्षांपासून सदस्य आहे. यापूर्वी अमेरिकेत झालेल्या आंतरराष्टÑीय अंतराळ संशोधन विकास परिषदेतही जाखडी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक शहरात या जागतिक संस्थेचे केंद्र स्थापन झाल्यामुळे अंतराळ ज्ञान-विज्ञान व जन-जागृतीसाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता विविध कार्यक्रम तसेच जगभरातून होणाऱ्या विविध मोहिमांच्या घडामोडींविषयीची सखोल माहिती दिली जाणार असल्याचे जाखडी यांनी सांगितले.  यासाठी विविध नामांकित अंतराळ क्षेत्रातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कार्यशाळा, परिसंवाद, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. नाशिक-ला एचएएल, विमानतळ, डीआरडीओ यांसारख्या संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची अधिक संख्या शहरात असून त्यांना या नव्या क्षेत्राविषयी कुतूहलदेखील आहे. म्हणून नाशिकला या संस्थेने केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली. या केंद्राला अधिकाधिक वाव नाशिकमध्ये असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याचा विश्वास शिरोडे यांनी व्यक्त केला आहे.  अधिकाधिक लोकांनी व विद्यार्थ्यांनी या केंद्राशी स्वत:ला जुळवून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :NASAनासा