शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

राष्टय रोइंगपटूवर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:12 IST

तंबाखू खाण्यासाठी रोइंगपटू निखिल सोनवणे यास तिघा संशयित हल्लेखोरांनी मंगळवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हनुमानवाडी-मखमलाबाद लिंकरोडवरील पेट्रोलपंपाच्या वळणावर थांबवून धारदार शस्त्राने हल्ला चढविला.

नाशिक : तंबाखू खाण्यासाठी रोइंगपटू निखिल सोनवणे यास तिघा संशयित हल्लेखोरांनी मंगळवारी (दि.१४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास हनुमानवाडी-मखमलाबाद लिंकरोडवरील पेट्रोलपंपाच्या वळणावर थांबवून धारदार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात निखिल गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांसह दीपक सुखदेव डगळे (२१, रा. मोरे मळा) यास अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निखिल भाऊसाहेब सोनवणे असे या खेळाडूचे नाव असून, तो लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे गोदापार्कजवळील वॉटर स्पोर्ट्स क्लबवर रोइंग या नौकानयन जलक्रीडा प्रकाराचा सराव करण्यासाठी सायंकाळी गेला होता. सराव आटोपून तो सायकलवरून क्रांतीनगर येथील बाफणा चाळीकडे जात असताना हनुमानवाडी लिंकरोडच्या वळणावर डगळे यासह दोघा अल्पवयीन हल्लेखोरांनी त्यास अडविले. ‘तंबाखू दे’ असे सांगून त्याच्याशी वाद घातला. दरम्यान, त्याने तंबाखू खात नसल्याचे सांगितल्यानंतर मनात राग धरून त्याची लूट करण्याच्या उद्देशाने तिघांनी त्यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.स्पर्धेला मुकणार; सरावावर पाणीयेत्या शुक्रवारपासून पुणे येथील नाशिक फाट्याजवळील आर्मी बोटिंग क्लब येथे राज्यस्तरीय रोर्इंग स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी निखिल करत होता. मागील अनेक महिन्यांपासून तो गोदापात्रात नौकानयन करत घाम गाळत होता; मात्र या तिघा हल्लेखोरांनी त्याच्या मेहनतीवर पाणी फिरविले असून, त्याला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुकावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक