शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये इंधन दरवाढी विरोधात राष्टÑवादीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 18:19 IST

आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, नाशिकमध्ये पेट्रोलचे दर ८२ रुपये ३९ पैसे

नाशिक : पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दुपारी सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील पेट्रोलपंपाजवळ सरकारच्या निषेधार्थ फलक घेऊन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘पेट्रोल डिझेल के बढे दाम, सरकारने किया जिना हराम’,‘नही चाहिये अच्छे दिन, लोटा दो पुराने दिन’, ‘वाह रे सरकार तेरा खेल, खा गये राशन बढ गया तेल’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, नाशिकमध्ये पेट्रोलचे दर ८२ रुपये ३९ पैसे, तर डिझेलचा एक लिटरचा दर ६८ रुपये ४ पैसे झाला आहे. आतापर्यंतचा डिझेल, पेट्रोल दराचा हा उच्चांक आहे. विशेष म्हणजे मुंबईत लिटरमागे पेट्रोलचे दर ८१ रुपयांवर, तर डिझेल प्रतिलिटर ६८ रुपये आहे. फेब्रुवारी २०१८ नंतर पेट्रोल डिझेलच्या दराच्या उच्चांकाने गाठलेला हा नवा पल्ला आहे. गेल्या वर्षभरात तर पेट्रोल ९ रुपये, तर डिझेलमध्ये ७ रुपयांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातही प्रत्येक पेट्रोलपंपावर वेगवेगळे दर असून, त्यात ५ पैशांच्या आसपास फरक आहे. या दरवाढीचा सर्वच वस्तूंवर परिणाम होणार असल्यामुळे त्याचाही फटका बसणार असल्याचे युवक कॉँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा, पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून जीएसटी किंवा वस्तू सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली. याप्रसंगी चिन्मय गाढे, अमोल नाईक, मुकेश शेवाळे, शिवराज ओबेरॉय, दीपक पाटील, मकरंद सोमवंशी, किरण पानकर, भूषण गायकवाड, कुणाल बागडे, सिद्धांत काळे, विशाल डोखे, कैलास धात्रक, सुनील तुपे, प्रवीण घोटेकर, अमोल तुपे, रोहित नाईक, इमरान अन्सारी, नीलेश कर्डक, पप्पू इंगळे, रोहित जाधव, राजरांधा वाघ, गणेश पाटील, प्रेम पालीवाल, संदीप चव्हाण, नीलेश भामरे, मुराघ राख, अक्षय राउत आदींसह मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक