शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

नाशिककरांची सायकल चळवळ प्रेरणादायी

By admin | Updated: March 26, 2015 00:14 IST

अभिषेक बच्चन : नाशिक सायकलिस्टच्या ‘पॅलॅटोन-२०१५’चे बक्षीस वितरण

नाशिक : सायकल हे एकमेव असे वाहन आहे जे पर्यावरणपूरक आहे. निसर्गासह नागरिकांचेही आरोग्य सुदृढ ठेवण्यामध्ये सायकलची महत्त्वाची भूमिका असून, नाशिककरांनी हे समजून घेत विकसित केलेली सायकल चळवळ नक्कीच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेता अभिषेक बच्चन यांनी केले.नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या ‘पॅलॅटोन-२०१५’ सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा शहरातील आसारामबापू पुलाजवळ पार पडला. यावेळी बच्चन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अभिषेक यांनी नाशिककरांचे सायकलविषयी असलेले प्रेम व उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी व मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी सायकलचा छंद प्रत्येकाने जोपासावा असा संदेश नाशिककरांच्या सायकल चळवळीने दिला आहे. नाशिक सायकलिस्टकडून आज्ञा झाली तर मुंबईहून नाशिकला सायकलवर नक्कीच येण्याचा प्रयत्न करू. चित्रपटनगरीमध्येदेखील मी सायकल चालविण्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करील. यावेळी व्यासपीठावर फाउण्डेशनचे अध्यक्ष विशाल उगले, सायकलपटू तथा महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक हरीश बैजल, सचिव डॉ. मनीषा रौंदळ, अनंत राजेगावकर, श्रीकांत बडवे, प्रवीण पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेत अठरा ते पन्नास वर्षे वयोगटात १५० किलोमीटर सायकल चालवित प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले अहमदनगरचे सायकलपटू रवि करांदे, प्रदीप कुंडू, रमेश जोशी यांना ३१ हजारांचा धनादेश, प्रमाणपत्र व आधुनिक सायकल बक्षीस म्हणून अभिषेकच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांकही अहमदनगरच्या सायकलपटूनींच राखण्यात यश मिळविले. के. आशिष, जितु सिन्हा, अमीत शर्मा या सायकलपटूंना द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. तृतीय क्रमांक नाशिकच्या सायकलपटूंनी मिळविला. यामध्ये डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, अरुण भोये यांना अकरा हजार रुपयांचे पारितोषिक अभिषेक यांच्या हस्ते देण्यात आले. (प्रतिनिधी)