शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनीच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 02:14 IST

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजीवनीकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता संजीवनीची स्पर्धा चॅनल्सवर पाहता येणार आहे.

ठळक मुद्देआज धावणार : बहरिन आणि केनियन खेळाडंूंचे आव्हान

नाशिक : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव ही शनिवारी (दि. २५) १० हजार मीटर शर्यतीत धावणार असल्याने तिच्या कामगिरीकडे तमाम नाशिककरांचे लक्ष लागून आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजीवनीकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता संजीवनीची स्पर्धा चॅनल्सवर पाहता येणार आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात पदकांची संख्या वाढत असताना संजीवनीच्या रूपाने आणखी एक पदक भारताला मिळण्याची दाट शक्यता आहे. भूतान येथील सरावानंतर परदेशी वातावरणाशी जुळवून घेत फिटनेस कायम राखल्यामुळे संजीवनीची कामगिरी या स्पर्धेत उंचावण्याची शक्यता आहे. संजीवनीने यापूर्वी तुर्कस्तानच्या खेळाडूंबरोबरच स्पर्धा केलेली असल्यामुळे त्यांच्याबरोबर ती चुरशीची स्पर्धा नक्कीच करू शकेल; मात्र बहरिन आणि केनियन खेळाडूंचे काही प्रमाणात आव्हान तिच्यासमोर असणार आहे.कविता राऊत हिच्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत नाशिकची खेळाडू म्हणून सहभागी झालेल्या संजीवनीकडून नाशिककरांच्या मोठ्या अपेक्षा आहे. कविताने तिच्या दोन्ही इव्हेंटमध्ये दोन पदके पटकाविली होती. अशीच कामगिरी संजीवनी देखील करू शकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नाशिकच्या क्रीडाक्षेत्राकडून संजीवनीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टॅग्स :Sportsक्रीडाNashikनाशिक