नाशिक : महाराष्ट्राला समाजसुधारकांची एक थोर परंपरा आहे़ छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होणे निश्चितच चांगली गोष्ट नाही़ तळेगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना निंदनीय असून यातील दोषींवर कायदेशीर व कठोर कारवाई केली जाणार आहे़ मात्र, तोेपर्यंत नाशिककरांनी समतोल बिघडू न देता शांतता राखावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी बुधवारी (दि़ १२) केले़ तळेगाव घटनेतील बालिकेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी संभाजीराजे नाशिकला आले होते़ यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, तळेगाव प्रकरणातील संशयितावर लवकर दोषारोपपत्र, खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात होऊन त्यास कठोर शिक्षा व्हावी यासाठी उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे़
नाशिककरांनी शांतता राखावी : संभाजीराजे भोसले
By admin | Updated: October 12, 2016 23:43 IST