शहरं
Join us  
Trending Stories
1
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
2
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
3
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
4
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
5
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
6
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
7
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
8
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
9
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
10
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
11
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
12
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
13
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
14
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
15
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
16
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
17
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
18
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
19
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
20
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री

‘पाणी वाचवा’ संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

By admin | Updated: July 14, 2014 00:28 IST

‘पाणी वाचवा’ संदेश देण्यासाठी धावले नाशिककर

नाशिक : पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. नाशिक महापालिकेनेही पाणीकपात सुरू केली आहे. या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करा आणि पाणीबचत करा, असा संदेश देण्याकरिता रविवारी सेव्ह वॉटर रनचे आयोजन करण्यात आले होते. वर्ल्ड आॅफ स्पोटर््स शिक्षण सांस्कृतिक संस्था आणि डेकॅथलॉन यांच्या संयुक्त विद्यमाने या सेव्ह वॉटर रनचे आयोजन करण्यात आले होते. गोल्फ क्लब सिग्नलपासून सकाळी साडेसात वाजता या रनला प्रारंभ झाला. क्रेडाईचे माजी अध्यक्ष व निसर्गप्रेमी किरण चव्हाण, नंदू देसाई यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रनचा आरंभ करण्यात आला. टिळकवाडी मार्गे वावरे चौक, सीबीएस, त्र्यंबक नाका मार्ग गोल्फ क्लब येथे रनचा समारोप करण्यात आला. रनच्या माध्यमातून लोकांना पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. या रनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना डेकॅथलॉनच्या वतीने प्रत्येकी शंभर रुपयांचे डिस्काऊंट कूपन देण्यात आले. तसेच सहभागीमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. विजेत्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. सागर बोंडे, भगवान काळे, चंद्रकांत पाटील, श्रेयस त्रिवेदी, हरी सोनकांबळे, प्रकाश ढगे यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. रनमध्ये संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, भाऊसाहेब पाटील, संजय शिंदे, अनिल उगले, कुणाल धनवंत, कुणाल कानडे, निखिल कुलकर्णी, निनाद व आशिष निंबाळते, सचिन कोरडे, शुभम केदार, अभिजित चव्हाणके आदिंसह नाशिककर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)