शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना जाणवू लागली गुलाबी थंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:38 IST

दोन दिवसांपूर्वी शहराच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांनी थंडीचा कडाका अनुभवला. थंडीचे दमदार आगमन झाले म्हणून उबदार कपड्यांचा वापरही सुरू केला; मात्र पुन्हा पारा चढू लागल्याने सध्या नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला आहे.

ठळक मुद्देशहर गारठले : तपमानाचा पारा १३ अंशांवर

नाशिक : दोन दिवसांपूर्वी शहराच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.५ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांनी थंडीचा कडाका अनुभवला. थंडीचे दमदार आगमन झाले म्हणून उबदार कपड्यांचा वापरही सुरू केला; मात्र पुन्हा पारा चढू लागल्याने सध्या नाशिककरांना गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला आहे.यावर्षी थंडीचे आगमन उशिराने झाले. परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे थंडीची तीव्रता अद्यापही अधिक जाणवत नाही; मात्र मंगळवारी (दि.१३) अचानकपणे पारा ११.५ अंशांपर्यंत घसरला होता. तरीदेखील कमाल तपमान मात्र तिशीपार नोंदविले गेल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता कमी झालेली दिसून आली. बुधवारी १२.२ तर गुरुवारी (दि.१५) १३ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. त्यामुळे थंडीची तीव्रता पुन्हा कमी झाल्याचे जाणवले. तरीदेखील राज्यात प्रमुख शहरांमध्ये नोंदविण्यात आलेल्या किमान तपमानात नाशिकचा समावेश आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, परभणी, नागपूर या शहरांमध्ये १३ अंश इतक्या कमी तपमानाची नोंद भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. महाबळेश्वरमध्ये १६ तर साताऱ्यात १४.५ इतके तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरण