उत्तर भारतात आलेल्या शीत लाटेमुळे शहराच्या किमान तपमानात मोठी घट झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मंगळवारी शहराचा पारा ७.४ अंशापर्यंत घसरला होता; मात्र बुधवारी (दि. २३) पारा थेट ६ अंशावर गेल्याने शहर अधिकच थंड झाले.शहराच्या किमान तपमानाचा हा मोसमातील नीचांक असून, राज्यभरात सर्वांत कमी तपमान नाशिकलाच नोंदवण्यात आले. काही दिवसांपासून शहराचे किमान तपमान १२ ते १४ अंशांवर स्थिर होते; मात्र आज एकाच दिवसात तपमानात तब्बल सात अंशांनी घट झाली.यापूर्वी चालू मोसमात २० नोव्हेंबर रोजी शहरात ११.५, तर ६ डिसेंबर रोजी ११.६ इतक्या किमान तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा ६ अंशांपर्यंत घसरला.
नाशिक गारठले
By admin | Updated: December 23, 2015 22:39 IST