शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

१७७ ग्रामपंचायतींचा अनियंत्रित कारभार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:21 IST

ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू असल्याची बाब विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामपंचायतींच्या कारभार तीव्र आक्षेप घेत या ग्रामपंचायतींवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

ठळक मुद्देआयुक्त संतप्त : विभागीय आयुक्तांनी अधिकाºयांना खडसावले नियमानुसार कामकाज करण्याचा सल्ला

नाशिक : ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जात असतानाही जिल्ह्यातील १७७ ग्रामपंचायतींकडून अनियंत्रित आणि स्वैर कारभार सुरू असल्याची बाब विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ग्रामपंचायतींच्या कारभार तीव्र आक्षेप घेत या ग्रामपंचायतींवर कारवाईचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या तालुका तसेच ग्रामपातळीवर कामकाजात अक्षम्य उदासिनता आणि अनियमितता आढळून आल्याने त्यांनी अधिकाºयांची चांगलीच कानउघाडणी केली. मुख्य कार्यकारी अधिकाºयांपासून तालुकास्तरावरील अधिकाºयांनाही त्यांनी चांगलेच सुनावल्याचे समजते. कामातील दिरंगाई आणि अपूर्ण दप्तर पाहून दोन अधिकाऱ्यांना त्यांनी कक्षाबाहेर काढून दिल्याचेही बोलले जात आहे.विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलाविली होती. जिल्हा परिषदेचे अधिकारी, खातेप्रमुख, गटविकास अधिकारी आदी अधिकाऱ्याच्या कामकाजाचा आढावा घेताना कामकाजात कोणतेही गांभीर्य नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. विशेषत: ग्रामपंचायतींचा आढावा घेताना सर्व नियम डावलून कामकाज होत असल्याने त्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले. ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेत असताना १७७ ग्रामपंचायतींकडे कामाचे आणि खर्चाची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. कामे करताना विनानिविदा केलेली कामे, खर्चाचे नियोजन, आराखडा यांची कागदपत्रे नसताना कामकाज होत असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत विशेष अधिकारान्वये या ग्रामपंचायतींवर प्रसंगी बरखास्तीची कारवाई करण्याचाही इशारा दिला.महिला बालकल्याण विभागाचा खर्च गेल्या दोन वर्षांपासून झालेलाच नसल्याने विभागीय आयुक्त चांगलेच संतापले. कोट्यवधींचा निधी असतानाही कामे केली जात नसल्याने त्यांनी संबंधितांना जाब विचारला. कामातील अनियमिता आणि गांभीर्य नसल्याने सर्व नियम डावलून कामांबाबत उदासिनता असल्याने त्यांनी अधिकाऱ्याना नियमानुसार कामकाज करण्याचा सल्ला दिला.

 

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद