शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा परिषद आवारात ‘वाहनबंदी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 20:59 IST

जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या  वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना  बसला आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या  वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना दिल्या असल्याने वाहने आत आणण्यासाठी सातत्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याचा सर्वाधिक फटका जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांना  बसला आहे.जिल्हा परिषद आवारात पार्किंगला पुरेशी जागा नसल्याने आणि दिवसभरात अनेक वाहने येथे उभी केली जात असल्याने जिल्हा परिषदेच्या मार्गात वाहन कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय नेते, माजी सदस्य तसेच ठेकेदारांची वाहने जिल्हा परिषद आवारात आणली जातात. त्यामुळे सदर वाहने आत आणणे आणि बाहेर घेऊन जाणे यामुळे वाहनकोंडीचा प्रश्न नेहमीच उद्भवत असतो. प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाला सर्वांनाच मदत करावी लागत असल्याने आलेल्या वाहनांना आत घेण्यापासून बाहेर जाण्यासाठी मदतही करावी लागते. त्यातच अनेक कर्मचारी हे आपली दुचाकी मुख्य इमारतीच्या मागील बाजूस उभी करतात. त्यामुळे त्यांना या चारचाकी वाहनांतूनही दुचाकी काढणे कठीण होते. यातून अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात.या प्रकारामुळे ‘जिल्हा परिषद आवार की वाहनतळ’ असा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदParkingपार्किंग