शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकांच्या दिरंगाईमुळे रखडली रोजगार हमी मजुरांची मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 20:08 IST

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी वेळीच मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’मध्ये मजुरांचे खाते जोडण्याची प्रक्रिया थंडावल्याने मजुरांना त्यांची मजुरी मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील केवळ ३३ टक्के मजुरांचे बॅँक खाते या प्रणालीला जोडण्यात आली आहेत.

ठळक मुद्देयोजनेला हरताळ : आधारबेस पेमेंट प्रणाली रखडलीजिल्ह्यातील ३३ टक्के मजुरांचे बॅँक खाते प्रणालीला जोडली

नाशिक : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी वेळीच मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’मध्ये मजुरांचे खाते जोडण्याची प्रक्रिया थंडावल्याने मजुरांना त्यांची मजुरी मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील केवळ ३३ टक्के मजुरांचे बॅँक खाते या प्रणालीला जोडण्यात आली आहेत.केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या राष्ट्रीय  ग्रामीण हमी योजनेंतर्गत मजुरांसाठी ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील बॅँकाकडून मजुरांचे खाते या प्रणालीवर जोडण्यास विलंब होत असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मजुरांचे आधार क्रमांक बॅँक खात्याशी जोडण्याची सर्वप्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेली आहे. असे असतानाही केवळ ही खाते ‘आधार बेस पेमेंटप्रणाली’ला जोडण्याबाबतची कार्यवाही  होत नसल्याने मजुरांच्या रोजगाराचा आणि मजुरीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सुमारे २ लाख १७ हजार ३०३ मजुरांचे आधार क्रमांक बॅँक खात्याशी जोडण्याबाबतचे प्रपत्र जिल्ह्यातील तालुकास्तरावरील सर्व संबंधित बॅँकांकडे जमा करण्यात आलेले आहेत. मात्र विविध बॅँकांकडून आत्तापर्यंत केवळ ७१,४६३ मजुरांच्याच आधार क्रमांकाची पडताळणी करून ते बॅँक खात्याशी लिंक करण्यात आले आहे. उर्वरित मजुरांचे संकेतस्थळावरील आधार क्रमांकाची जोडणी व पडताळणी झालेली नसल्याने मजुरांना कामाची मजुरी आधार बेस प्रणालीद्वारे मिळण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.केंद्र शासनाचा हा उपक्रम असल्यामुळे यासाठी सर्व संबंधित यंत्रणानांनी जबाबदारीने यामध्ये योगदान देणे अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या आॅनलाइन पेमेंट प्रणालीपेक्षा आधार बेस पेमेंट प्रणालीद्वारे (एबीपीएस) प्रभावी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे बॅँकांनी मजुरांच्या आधार क्रमांकांची पडताळणी करून आधार बेस पेमेंटप्रणालीद्वारे मजुरी अदा करण्यासाठी तत्काळ बॅँकांनी कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद