शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क: सिडको : महापालिका सिडको पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे सिडकोतील औदुंबर स्टॉप परिसरातील एन-८ सेक्टरमध्ये गेल्या पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क:सिडको : महापालिका सिडको पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे सिडकोतील औदुंबर स्टॉप परिसरातील एन-८ सेक्टरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठाच झालेला नाही, तर काही ठिकाणी गढूळ आणि मातीमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या पाच दिवसांपासून येथील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे.मागील पाच ते सहा दिवसांपासून याठिकाणी पाइपलाइनचे काम करण्यासाठी खड्डा खोदण्यात आल्याने याठिकाणी ड्रेनेज व पाण्याची पाइपलाइन एकत्र झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. औंदुबर स्टॉप परिसरातील एन-८ सेक्टर भागात गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेक दिवसांपासून याठिकाणी पाइपलाइनचे काम करण्यासाठी खड्डा खोदून ठेवला असल्यानेच याठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.सोमवारी या परिसरातील काही भागात पाणीपुरवठा झाला असला तरी अक्षरश: गढूळ पाण्याचा पुरवठा झाला आहे. ऐन उन्हाळ्यात या भागात पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे तक्र ार करूनही उपयोग झाला नाही. पाणीपुरवठा विभागाकडूनच याठिकाणी खोदण्यात आलेल्या या खड्ड्यामुळेच पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन एकत्र झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ करावा, अशी मागणी परिसरातील राजू खांडेकर, दिलीप परदेशी, वसंत कोठावदे, पवन साळी, दिनेश सोनवणे, मंगेश जाट, मंगेश माली, सुनंदा कोठावदे, पूजा कुलकर्णी, रु पाली देवरे, शारदा जपूर, शालिनी दुसाने, भारती खानडेकर, वर्षा सारडा यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCorruptionभ्रष्टाचार