शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात स्वाइन फ्लूचे १४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 16:53 IST

नाशिक : दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका ...

ठळक मुद्देवातावरण बदलाचा परिणाम : शहरी भागाला सर्वाधिक धोका

नाशिक : दिवसा आणि रात्रीच्या सुमारास तापमानातील बदलामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असून, याचा सर्वाधिक धोका शहरी भागात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय देकाटे यांनी दिली. जानेवारी ते मार्च या कालावधीत   जिल्ह्यात १४७ रुग्ण आढळून आले असून, १४ जणांचा यात मृत्यू झाला आहे.वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने या वातावरणातही एच वन, एन वनचे विषाणू कार्यरत होत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी वैयक्तिकरीत्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर देकाटे यांनी सांगितले की, दिवसाचे तापमान व रात्रीच्या तापमानामध्ये कमालीची तफावत आढळून येत आहे. या परिस्थितीमध्ये एच वन, एन वन (स्वाइन फ्लू) या आजाराची रु ग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता असते.आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागांमधून एच वन, एन वनसदृश १४७ रु ग्ण आढळून आलेले आहेत व आजपर्यंत १४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सदर रु ग्णाचे प्रमाण हे शहरी भागांमध्ये जास्त आढळून येत असल्याने स्वत:ची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. ताप, सर्दी, घसादुखी, पडसे यांसारखी लक्षणे दिसून आल्यास अंगावर न काढता डॉक्टरांकडून तपासून उपचार घेणे गरजेचे असल्याचे देकाटे यांनी सांगितले. आजारी व्यक्तीने गर्दीमध्ये मिसळू नये तसेच सर्दी-पडसेची लक्षणे आढळून आल्यास शिंकताना खोकताना रु मालाचा वापर नियमितपणे करावा तसेच आहार चांगल्या पद्धतीने घेण्यात यावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आराम करावा, लहान मुलांना उबदार कपड्यांमध्ये ठेवावे त्यांना वेळीच दवाखान्यात दाखवून उपचार करून घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या आजारावरील औषधे टॉमी फ्लू सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रु ग्णालय येथे उपलब्ध असून संशय वाटल्यास त्वरित संबंधित आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावे, सामाजिक समारंभ, जत्रा, शाळा, वसतिगृहे या ठिकाणी हे आजार वेगाने पसरतात त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये ताप येणे, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, लहान मुलांमध्ये उलटी आणि जुलाबाची लक्षणे अशी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन उपचार करून घेण्यात यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ुु

टॅग्स :NashikनाशिकSwine Flueस्वाईन फ्लू