शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 17:41 IST

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पोलिसांनी उधळून लावल्यानंतर दुसºया दिवशी आंदोलनकर्ते पुन्हा त्याच जागेवर येऊन बसले आहेत. पोलिसांनी काल आंदेलनकर्त्यांचा मंडप जप्त केल्यामुळे आंदोलनकर्ते भर उन्हातान्हात उपोषण करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीच सुमारे आठ कर्मचाºयांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात ...

ठळक मुद्देभर उन्हात आंदोलन सुरू झाल्याने आंदोलनाचे गांभिर्य अधिकच वाढलेजिल्हा प्रशासन आणि आरोग्य विद्यापीठ प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आरोग्य विद्यापीठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण पोलिसांनी उधळून लावल्यानंतर दुसºया दिवशी आंदोलनकर्ते पुन्हा त्याच जागेवर येऊन बसले आहेत. पोलिसांनी काल आंदेलनकर्त्यांचा मंडप जप्त केल्यामुळे आंदोलनकर्ते भर उन्हातान्हात उपोषण करीत असल्याने त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीच सुमारे आठ कर्मचाºयांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आता भर उन्हात आंदोलन सुरू झाल्याने आंदोलनाचे गांभिर्य अधिकच वाढले आहे.गेल्या सहा महिन्यांपासून समान काम समान दाम या मागणीसाठी आंदोलन पुकारलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांनी १ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पंधरा दिवस झाले असून अत्तापर्यंत आठ कर्मचाºयांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. असे असतांनाही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतेही चर्चा अथवा सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांचा मंडप काढून उपोषणकर्त्यांना हटविण्याचे आदेश पोलिसांना दिल्याने पोलिसांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आंदोलन उधळून लावले. काही आंदोलनकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्यांचे पिण्याच्या पाण्याचे जारही पोलिसांनी जप्त केले. विशेष म्हणजे संघटनेचे नेते उपस्थित नसतांना पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर बळाचा वापर करीत त्यांना पोलीस ठाण्यात आणले.मात्र दुसºया दिवशी उपोषणकर्त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमो उपोषण सुरू केले असून भरऊन्हातान्हात उपोषण करण्यात आले असून आंदोलनकर्त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास प्रशासन त्यास जबाबदार राहील अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.दरम्यान, उपोषणकर्त्यांच्या कठोर भूमिकेमुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विद्यापीठ प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठ