शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांसाठी ४१० ग्राम बालविकास केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:57 IST

नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार बालके कुपोषित आढळल्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने लोकसहभागातून ४१० ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली असून, या केंद्रात सद्यस्थितीत सुमारे ४९६ बालकांना पूरक आहार आणि औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ तर मध्यम गंभीर कुपोषित ...

ठळक मुद्देउपाययोजना : लोकसहभागातून पूरक आहार

नाशिक : जिल्ह्यात सुमारे अडीच हजार बालके कुपोषित आढळल्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने लोकसहभागातून ४१० ग्राम बालविकास केंद्रे सुरू केली असून, या केंद्रात सद्यस्थितीत सुमारे ४९६ बालकांना पूरक आहार आणि औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ तर मध्यम गंभीर कुपोषित बालकांची संख्या २०४२ इतकी आढळून आल्यानंतर महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी अधिकाऱ्यांना केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले होते.गेल्या आठवड्यात झालेल्या विषय समितीच्या सभेत जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला असता धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. जिल्ह्यात फेब्रुवारी २०१८ अखेर मध्यम गंभीर कुपोषित बालके २०४२ व तीव्र गंभीर कुपोषित बालकांची संख्या ६२९ आढळून आली आहे. कुपोषण हा विषय अतिशय संवेदशनील असतानाही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने कुपोषित बालक आणि मातांचे प्रमाण वाढल्याने सभापती खोसकर यांनी अधिकाºयांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अवघ्या दोनच दिवसांत लोकांनी मदतीचा हात पुढे केल्याने ४१० प्रकल्पांमध्ये ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या आहाराचे आणि उपचाराचे नियोजन करण्यात आले आहे. या केंद्रात २५ दिवस बालकांना ठेवण्यात येणार आहे. केंद्रात दाखल झालेल्या बालकांचे वजन करणे आणि पंचवीस दिवसांनंतर पुन्हा वजन करणे, अशी ही प्रक्रिया आहे. तसेच दिवसातून आठ वेळा कुपोषित बालकांना आहार देण्यात येणार असून त्यामध्ये सहा वेळा केंद्रातून आहार दिला जाणार आहे, तर दोन वेळचा घरचा आहार बालकांना दिला जाणार आहे. सदर केंद्र सुरू करण्यासाठी दानशूरांनी मोठी मदत केली आहे. सुमारे ५७ हजार रुपये वस्तू स्वरूपात प्राप्त झाले आहे, तर दोन लाख ७९ हजार रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत. या पैशातून आणि दानातून बालकांना सुदृढ बनविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद